महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रानंतर आता बिहारचा नंबर? सुशील मोदी म्हणाले, नितीशकुमारांनी नाक घासले तरी... - बिहारचे राजकारण

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील मोदी सातत्याने नितीशकुमार यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'जेडीयूचे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात आहेत', असा दावा त्यांनी केला आहे.

Sushil Modi
सुशील मोदी

By

Published : Jul 3, 2023, 3:40 PM IST

सुशील मोदी

नवी दिल्ली :महाराष्ट्रातील राजकीय हालचालींचा सर्वात मोठा परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहे. आता तेथील सत्ताधारी पक्षाला आपल्या भवितव्याची चिंता लागली असून ते भाजपवर हल्लाबोल करत आहेत. भाजपला आपल्या मित्रपक्षांना नष्ट करायचे आहे, असे जेडीयूचे नेते म्हणत आहेत. दुसरीकडे, जेष्ठ भाजप नेते सुशील मोदी यांच्या वक्तव्यामुळे नितीशकुमारांची चिंता वाढली आहे.

'जेडीयूमध्ये गोंधळाची स्थिती' : सुशील मोदी म्हणाले की, 'आजच्या परिस्थितीत जेडीयूला 8 ते 10 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही. जे खासदार आहेत त्यांना वाटते की त्यांचे भविष्य काय असेल? नितीशकुमार यांच्यानंतर जेडीयूला भविष्य नाही. प्रत्येकाला आपले भविष्य अंधारात दिसत आहे. त्यामुळे पक्षात गोंधळाची परिस्थिती आहे. खासदार, आमदार इतर पक्षांशी संपर्क साधत आहेत'.

महाराष्ट्रानंतर आता बिहारची पाळी आहे का? :या प्रश्नावर सुशील मोदी म्हणाले की, 'बिहारमध्ये बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या 17 वर्षात नितीश कुमार यांनी कधीही खासदार आणि आमदारांना भेटण्यासाठी एक मिनिटाचा वेळ दिला नाही. त्यांना भेटण्यासाठी लोकांना वर्षभर वाट पाहावी लागते. आता मात्र ते प्रत्येक खासदार आणि आमदाराला अर्धा तास देत आहेत'.

जेव्हापासून नितीश कुमार यांनी राहुल गांधींना नेता म्हणून स्वीकारले आणि तेजस्वी यादव यांना त्यांचा उत्तराधिकारी बनवले, तेव्हापासून जेडीयूमध्ये बंडखोरीची स्थिती आहे. जेडीयूचा एकही आमदार किंवा खासदार राहुल गांधी वा तेजस्वी यादव याना स्वीकारायला तयार नाही. आपले तिकीट कापले जाणार हे खासदारांना माहीत आहे. - सुशील कुमार मोदी, भाजप खासदार.

'अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात' :सुशील मोदी पुढे म्हणाले की, 'नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव उत्तराधिकारी होणार नाही असे ठरवले तर पक्ष टिकेल, अन्यथा पक्ष तुटेल. जेडीयूचे राजदमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. यावेळी निर्माण झालेल्या गदारोळामुळे नितीश चिंतेत आहेत. येणाऱ्या काळात काहीही होऊ शकते. मोठ्या संख्येने लोक आमच्या संपर्कात आहेत'. ते पुढे म्हणाले की, 'अमित शाह यांनी आम्ही नितीश कुमारांना स्वीकारणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यांनी भाजपच्या दारात नाक घासले तरी आम्ही त्यांना स्वीकारणार नाही. आम्ही त्यांना 17 वर्षे वाहून नेले, आता नाही'.

हेही वाचा :

  1. Sanjay raut on maharashtra politics crisis : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना हटविण्यात येणार, 16 आमदार ठरणार अपात्र : संजय राऊत
  2. Maharshtra Political Crisis Live : घडामोडींना वेग; राहुल नार्वेकर, अजित पवार यांची देवेंद्र फडणवीसांच्या घरी बैठक
  3. Maharashtra Political Crisis : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 'या' आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, जाणून घ्या सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details