नवी दिल्ली: राहुल गांधींनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर लगेचच भाजप नेते रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी राहुल गांधी घाबरलेले आहेत, असे म्हणत प्रत्युत्तर दिले. महागाई, बेरोजगारी यावर सभागृहात चर्चा होत असताना ते येत नाहीत. सदनामधून बाहेर निघून जातात. राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही, असे ते खोटे का बोलले? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देशाला दिले पाहिजे असेही प्रसाद म्हणालेत (Rahul Gandhi about democracy).
राहुल गांधी खोटे -प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी खोटे बोलत आहेत. ते जामिनावर बाहेर असल्याचे त्यांनी देशाला सांगावे. राहुल गांधींची पत्रकार परिषद आम्ही नुकतीच पाहिली, असे प्रसाद यांनी सांगून त्यामध्ये ते घाबरले असल्याचे दिसते असेही प्रसाद म्हणाले. महागाई आणि बेरोजगारीची चर्चा हे निमित्त आहे. मुळात त्यांचेच ईडीला धमकावणे सुरू आहे. ते पुढे म्हणाले की राहुल गांधींना काय बोलावे. त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. बड्या संपादकांना तुरुंगात पाठवले. राहुल गांधी आम्हाला एका गोष्टीचे उत्तर द्या तुमच्या पक्षात लोकशाही आहे का?, असा सवालही प्रसाद यांनी केला.