नवी दिल्ली : मुस्लिम संघटना जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख मसूद मदनी यांच्या वक्तव्यावर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी टीका केली आहे. काही लोकांना अनावश्यक मुद्दे उकरुन काढायची सवय असते, अशी टीका त्यांनी मदनी यांच्यावर केली आहे. दर चार महिन्यांनी काही लोक देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. देश सर्वांचा असून असे वाद करण्याची काहींना सवय असल्याचे ते म्हणाले. तसेच मोहन भागवत यांनी कधीही भारत हिंदूंचा देश आहे असे म्हटलेले नाही. त्यांमुळे सामाजीक बांधिलकी धोक्यात आणण्याचे प्रयत्न काहीकडून होत असल्याचे ते म्हणाले.
तिहेरी तलाक किंवा बालविवाहात कायम सुधारणा : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी राज्यसभेत सरकारवर अनेक आरोप केले होते, त्यावर बोलताना नक्वी म्हणाले की, लोकसभा असो की राज्यसभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक गोष्ट सिद्ध केली आहे की सत्याचा पराभव होऊ शकत नाही. काँग्रेस, त्यांचे नेते तर्कविरहित, तथ्यांशिवाय सरकारवर टीका करतात. आसाममध्ये बालविवाहावर होत असलेल्या कारवाईवर बोलताना नक्वी म्हणाले की, तिहेरी तलाक किंवा बालविवाह यांसारख्या वाईट गोष्टींवर देशात नेहमीच सुधारणा झाली आहे. काही लोक नेहमी विरोध करतात तर, काही समर्थन करतात.