चेन्नई (तामिळनाडू) : राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या आणि अभिनेत्री व राजकारणी खुशबू सुंदर यांनी एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्या आठ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर अत्याचार केले होते.
वडील आई व मुलांना मारहाण करायचे : खुशबू म्हणाल्या की, जेव्हा एखाद्या मुलाचे लैंगिक शोषण होते, तेव्हा त्याचे डाग त्याच्या मनावर आयुष्यभर राहतात. ते मूल मुलगा आहे की मुलगी हे महत्त्वाचं नाही. त्या म्हणाल्या की, त्यांची आई अत्यंत निंदनीय विवाहातून गेली होती. त्यांच्या वडिलांनी पत्नी आणि मुलांना मारहाण करणे आणि त्यांच्या एकुलत्या एक मुलीवर अत्याचार करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, असे मानले होते.
वडिलांनी 16 वर्षांच्या असताना कुटुंब सोडले : खुशबूंनी सांगितले की, कुटुंबातील इतर सदस्यांवर गैरवर्तन होईल या भीतीने आठ वर्षांच्या असल्यापासून अत्याचार होत असले तरी त्यांनी तोंड बंद ठेवले होते. 'काही पण झाले तरी पती हा परमेश्वर असतो' अशी मानसिकता असल्याने त्यांची आई त्यांच्यावर विश्वास ठेवेल की नाही अशी त्यांना भीती होती. त्यांनी सांगितले की, त्या जेव्हा 15 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्या त्यांच्या वडिलांविरुद्ध बोलू लागल्या. त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी त्या फक्त 16 वर्षांच्या असताना कुटुंब सोडले. त्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहाची काय सोय आहे हे त्यांच्या कुटुंबाला माहित नव्हते.
2021च्या विधानसभा निवडणुकीत पराभव : खुशबू ह्या एक अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्त्या आहेत. त्या सुरुवातीला डीएमकेमध्ये सामील झाल्या होत्या. परंतु नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे त्या पक्षाच्या प्रवक्ता बनल्या. मात्र अखेरीस त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपच्या तिकिटावर 2021 ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांच्या द्रमुकच्या एन एझिलनकडून पराभव झाला.
हेही वाचा :Tunisha Sharma Suicide Case: शिझानची बाजू न्यायालयात लवकरच मांडण्यात येईल- अभिनेत्याच्या सुटकेनंतर कुंटुंबीयांची प्रतिक्रिया