लुधियाना पंजाबच्या लुधियानामध्ये शनिवारी एका भाजप नेत्याची हत्या करण्यात BJP Leader Murdered आली. शिवपुरी भागातील भाजप नेत्यावर 8-10 अज्ञात तरुणांनी अचानक हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर लोकांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित BHARAT BHUSHAN SHARMA MURDERED IN PUNJAB केले. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे.
भाजप नेते भारतभूषण शर्मा यांच्यावर काही लोक हल्ला करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच भाजप जिल्हाध्यक्षांसह अन्य भाजप कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी पोहोचून या घटनेचा निषेध केला. त्याचवेळी भाजप नेत्याच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.