नवी दिल्ली :संसदेत 127 वे घटनादुरूस्ती विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये सादर केल्यानंतर भाजपने आपल्या सर्व खासदारांना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर 10 तारखेला (आज) लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
संसदेत हजेरी बंधनकारक
भाजपने सोमवारी सायंकाळी आपल्या सर्व खासदारांना लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासाठी त्रिस्तरीय व्हीप जारी केला आहे. 10 आणि 11 ऑगस्ट रोजी भाजपच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहावे लागणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेत 127 वे घटनादुरूस्ती विधेयक सादर केलेले असताना भाजपने हा व्हीप जारी केला आहे. दरम्यान, या विधेयकावर 10 तारखेला लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
127 वे घटनादुरूस्ती विधेयक सोमवारी पटलावर
सामाजिक न्यायमंत्री विरेंद्र कुमार यांनी 127 वे घटनादुरूस्ती विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडले. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गांची यादी स्वतःच तयार करण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण अधिकार आहेत असे म्हणण्यासाठी तसेच देशाची संघराज्य प्रणाली अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने घटनेतील कलम 342अ, कलम 338ब आणि कलम 366 मध्ये सुधारणेची गरज असल्याचे या विधेयकाच्या उद्दीष्टे आणि कारणांमध्ये म्हटल्याचे कुमार यांनी सांगितले.
102 व्या घटनादुरूस्तीतून 338 ब चा समावेश