नवी दिल्ली :भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीतील मुख्यालयात आज महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह केंद्रीय निवडणूक समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आगामी निवडणुकांसाठी आखणार रणनीती :आगामी वर्षात मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे. भाजपाची केंद्रीय निवडणूक समिती ही भाजपमधील सर्वोच्च निर्णय घेणारी समिती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्याचे महत्वाचे काम ही समिती पार पाडणार आहे.
भाजपा विजयासाठी उतरणार निवडणुकीत :भाजपाचे नेते या निवडणुकीत विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी भाजपाची केंद्रीय निवडणूक समिती ही रणनीती आखणार आहे. मात्र मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातही छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात विरोधकांची सत्ता आहे. त्यामुळे या राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
राजस्थानमध्ये करणार लक्ष्य केंद्रीत :राजस्थानमध्ये भाजपाला काही मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार असल्याची माहिती भाजपातील सूत्रांनी दिली आहे. भाजपाचे अनेक उमेदवार काही मतदार संघात दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यावरही भाजपा नेते लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर काही ठिकाणी अगदी थोड्या मताने भाजपाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे, त्यामुळे अशा ठिकाणी भाजपा जास्त भर देणार आहे.
हेही वाचा -
- Atal Bihari Vajpayee Death Anniversary : अटलजींच्या नेतृत्वामुळे भारत सक्षम झाला; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांची अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली
- Supriya Sule : पंतप्रधान मोदींच्या 'त्या' टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, घराणेशाही...