महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jahangirpuri Violence : घरे उद्ध्वस्त करून भाजपने गरीबांविरुद्ध युद्ध पुकारले आहे -ओवेसी - जहांगीरपुरी दगल प्रकरण

जहांगीरपुरी भागात कथित बेकायदेशीर अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाईवर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाप्रमाणे दिल्लीतही घरे उद्ध्वस्त करून भाजपने गरीबांविरुद्ध युद्ध पुकारले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

खासदार असदुद्दीन ओवेसी
खासदार असदुद्दीन ओवेसी

By

Published : Apr 20, 2022, 12:43 PM IST

Updated : Apr 20, 2022, 1:01 PM IST

हैदराबाद - नवी दिल्लीतील दंगलग्रस्त जहांगीरपुरी भागात कथित बेकायदेशीर अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे. या कारवाईवर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ( Encroachment Action In Jahangirpuri Area ) उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाप्रमाणे दिल्लीतही घरे उद्ध्वस्त करून भाजपने गरीबांविरुद्ध युद्ध पुकारले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

जिवंत राहण्याची हिंमत दाखवल्याबद्दल त्यांना शिक्षा - भाजपने घरे उध्वस्त करून गरीबांविरुद्ध युद्ध घोषीत केले आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली ते यूपी आणि मध्यप्रदेश सारखी दिल्लीत घरे उद्ध्वस्त करणार आहेत. ( MP Asaduddin Owaisi ) कोणतीही नोटीस नाही, कोर्टात जाण्याची संधी नाही, फक्त गरीब मुस्लिमांना जिवंत राहण्याची हिंमत दाखवल्याबद्दल हे त्यांना शिक्षा देत आहेत असही ओवेसी म्हणाले आहेत.

पोलीस आमच्या नियंत्रणात नाही - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली 'संशयास्पद भूमिका' स्पष्ट करावी, अशी मागणीही ओवेसी यांनी केली. त्यांचे सरकार पीडब्ल्यूडी या विध्वंस मोहिमेचा भाग आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. "जहांगीरपुरीच्या लोकांनी अशा विश्वासघात आणि भ्याडपणासाठी त्यांना मतदान केले का? असही ओवेसी म्हणाले आहेत. ( Jahangirpuri Violence On Owaisi ) "पोलीस आमच्या नियंत्रणात नाही" असे त्यांचे वारंवार बोलणे येथे चालणार नाही, आता कायदेशीरपणा किंवा नैतिकतेचा ढोंगही त्यांना करता येणार नाही असही ते म्हणाले आहेत.


पोलीस संरक्षणाची मागणी - ओवेसी यांनी उत्तर दिल्ली महानगरपालिकेसह डीसीपी, यांना पत्र लिहले आहे. ज्यामध्ये पीडब्ल्यूडी, स्थानिक संस्था, पोलीस, बांधकाम/देखभाल विभाग, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, पशुवैद्यकीय विभाग आणि अंमलबजावणी कक्षाद्वारे विशेष संयुक्त अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

हेही वाचा -जहांगीरपुरीतील अतिक्रमण कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; उद्या होणार सुनावणी

Last Updated : Apr 20, 2022, 1:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details