महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amit Shah In Action Mode : भाजपसाठी आता अमित शाह मैदानात.. उत्तराखंड, गोव्याच्या उमेदवारांची यादी 'या' दिवशी होणार जाहीर - केंद्रीय मंत्री अमित शाह

उत्तराखंड विधानसभेत ( Uttarakhand Assembly Election 2022 ) भाजपची सत्ता राखण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी स्वतः भाजपची निवडणूक यंत्रणा हातात घेतली आहे. भाजपच्या निवडणूक तयारीचा संपूर्ण आढावा ( Amit Shah Reviews BJP Election Strategy) घेत शाह यांनी 'अबकी बार ६० पार'चा नारा दिला आहे.

अमित शाह
अमित शाह

By

Published : Jan 17, 2022, 1:46 AM IST

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ( UP Assembly Election 2022 ) १०५ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने रविवारी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या ( Uttarakhand Assembly Election 2022 ) सर्व ७० जागांवर सविस्तर चर्चा ( Amit Shah Reviews BJP Election Strategy ) केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष मदन कौशिक, निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी, प्रभारी दुष्यंत गौतम, सहप्रभारी आरपी सिंह आणि लॉकेट चॅटर्जी उपस्थित होते.

चार तास चालली बैठक

भाजप कार्यालयात सायंकाळी ६ वाजता सुरू झालेली बैठक रात्री १० वाजेपर्यंत चालली. रविवारी कोअर ग्रुपच्या बैठकीत उत्तराखंडच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ज्या ७० जागांविषयी चर्चा झाली त्याविषयी १९ जानेवारीला होणाऱ्या सीईसीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीत सहभागी होणार आहेत. सूत्रांनुसार, २० ते २१ जानेवारीपर्यंत उत्तराखंडसाठी ७० उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. उत्तराखंडच्या ७० जागा असलेल्या विधानसभेत सध्या भाजपकडे ५७ आमदार आहेत. यावेळी पक्षाने 'अबकी बार ६० पार'चा नारा दिला आहे.

गोव्यात ३८ जागांवर लढणार?

तत्पूर्वी दुपारी भाजपने गोवा विधानसभेच्या ( Goa Assembly Election 2022 ) ४० जागांसाठी चर्चा केली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, जी किशन रेड्डी यांच्यासह संघटना मंत्री उपस्थित होते. गोव्यातील विधानसभेच्या ४० पैकी ३८ जागा भारतीय जनता पक्ष यावेळी लढवणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षाने २ ख्रिश्चन बहुसंख्य जागांवर आपले उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची अंतिम उमेदवार यादी १९ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत यादीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details