महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka election results 2023 : भाजपाचा 'हनुमान' कुमारस्वामी; सत्तेसाठी भाजपाची जेडीएसला हाक - कर्नाटक निवडणूक निकाल

हनुमानाने काँग्रेसच्या पंजेत विजयाची संजीवनी दिली आहे. मतमोजणीच्या निकालानुसार भाजपा पिछाडीवर आहे. त्याचबरोबर जेडीएसदेखील पिछाडीवर आहे.

HD Kumaraswamy
एच. डी. कुमारस्वामी

By

Published : May 13, 2023, 11:17 AM IST

Karnataka election :कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 ची मतमोजणी आज होत आहे. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचा विजय दाखवण्यात आला होता. त्यानुसार काँग्रेस पक्ष कामगिरी करताना दिसत आहे. तर कनार्टकात आपली सत्ता असावी म्हणून पंतप्रधान मोदींनी भगवान हनुमानाला साद घातली होती. परंतु हनुमानाने काँग्रेसच्या पंजेत विजयाची संजीवनी दिली. दरम्यान मतमोजणीनुसार भाजपा पिछाडीवर आहे. त्याचबरोबर जेडीएसदेखील पिछाडीवर आहे. अशात भाजपाने सत्ता राजकारण सुरू केले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी जेडीएसशी संपर्क केला जात आहे. यामुळे एच. डी. कुमारस्वामी हे भाजपाचे हनुमान होणार का हे पाहावे लागेल.

कोणाच्या हातात येणार सत्ता : कर्नाटक राज्यात 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केला. आता जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार आज ठरेल. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.

भाजपाचा हनुमान: दरम्यान नेहमीप्रमाणे भाजपाने निवडणुकीच्या प्रचारात धर्माच्या मुद्दा उकरुन काढला होता. पण यावेळी त्यांनी राम भक्त हनुमानाचा धावा केला होता. जय हनुमान म्हणत पंतप्रधान मोदींनी प्रचाराचा धुराळा उडवला होता. परंतु मोदींनी हनुमानाचा केलेला धावा हा भाजपाच्या कामी येताना दिसत नाही. मतमोजणीमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपा आणि डी. कुमारस्वामी यांचा पक्ष पिछाडीवर आहे. अद्याप हाती आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस 112 जागांवर तर भाजप 77 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच चित्र स्पष्ट आहे, काँग्रेस सत्तेवर येणार आहे. अशात भाजपाने सत्ता खेळ सुरू केला आहे. भाजपा जेडीएसशी संपर्क करण्यास सुरुवात केली आहे. जर एच. डी. कुमारस्वामी यांनी हिरवा कंदील दिला तर कर्नाटकात भाजपा जेडीएसचे सरकार दिसेल. दरम्यान पण भाजपा कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री पदावर बसवणार का? हे पाहणं महत्त्वाचे असेल.

हेही वाचा -

ABOUT THE AUTHOR

...view details