लखनौ - भारतीय जनता पक्षाच्या सर्व 8 उमेदवारांनी आज राज्यसभेसाठी अर्ज ( 8 candidates BJP Rajya Sabha ) भरले आहेत. लक्ष्मीकांत बाजपेयी ( Laxmikant Bajpai ) , डॉ राधामोहन अग्रवाल ( Dr Radhamohan Agarwal ) , सुरेंद्र सिंह नागर ( Surendra Singh Nagar ) , बाबुराम निषाद, दर्शना सिंह, संगीता यादव, डॉ. के लक्ष्मण आणि मिथलेश कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी मुख्यमंत्री योगी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ( Deputy CM Keshav Prasad Maurya ) , उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर एकूण 31 सदस्य निवडले ( 31 members for Rajya Sabha ) जातात. त्यापैकी 11 सदस्य निवडले जात आहेत. यासाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी 31 मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ( BJP announced eight candidates ) आहे. 10 जून रोजी होणाऱ्या आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने सोमवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशमधील आणखी दोन नावांसह सर्व आठ उमेदवारांची घोषणा केली. उमेदवारी अर्ज दाखल करणारे डॉ. लक्ष्मीकांत बाजपेयी हे उत्तर प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर डॉ. राधामोहन अग्रवाल हे ( Dr Radha Mohan Agarwal ) गोरखपूर शहराचे आमदार आहेत.