महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल : मालदामध्ये भाजपाच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला - BJP CANDIDATE GOPAL CHANDRA SAHA

भाजपाचे उमेदवार गोपाल चंद्र साहा यांच्यावर अज्ञांतानी गोळी झाडली. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल

By

Published : Apr 19, 2021, 1:11 AM IST

कोलकाता -पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करत असताना मालदातील भाजपचे उमेदवार गोपाल चंद्र साहा यांना साहपूर भागात गोळ्या घालण्यात आल्या. निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झालेल्या गोपाल चंद्र साहा यांना मालदा मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टीएमसीने आश्रय घेतलेल्या गुंडांनी साहावर हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या हल्ल्याविरोधात सोमवारी भाजपाने निषेध मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी अद्याप हल्ल्याबाबत भाष्य केले नाही.

चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान गोळीबार -

जमावाने मतदान केंद्रावर हल्ला केल्यानंतर सीआयएसएफने गोळीबार केला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले. या घटनेनंतर संबंधित मतदान केंद्रवरील मतदान प्रकिया थांबवण्यात आली होती. ही घटना सितालकुची विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्रमांक 12 वर घडली आहे.

17 एप्रिलला पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले -

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या टप्प्यामध्ये ४५ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे. एकूण ३१९ उमेदवारांचे भविष्य मतपेट्यांमध्ये बंद झाले. मागील चारही टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटना पाहता, निवडणूक आयोगाने केंद्रीय सुरक्षा दलाच्या ८५३ तुकड्या मतदान पार पडणाऱ्या ठिकाणी तैनात केल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details