महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

KKs death demands probe : केकेच्या मृत्यूला टीएमसी जबाबदार- भाजपचा आरोप - politicizing KKs death

गायक केके याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ( Singer KKs body autopsy ) करण्यात येणार आहे. गायकाच्या डोक्यावर जखमेचे ठसे आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भाजपने पश्चिम बंगाल प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात, राज्यातील सत्ताधारी पक्ष टीएमसीने केकेच्या ( politicizing KKs death ) मृत्यूवर राजकारण करणे थांबवण्यास सांगितले आहे.

KKs death demands probe
केकेच्या मृत्यूला टीएमसी जबाबदार

By

Published : Jun 1, 2022, 5:19 PM IST

हैदराबाद- प्रसिद्ध गायक केके यांचे काल रात्री (३१ मे) कोलकाता येथे एका मैफिलीदरम्यान प्रकृती ( Singer kk death ) खालावल्याने निधन झाले. या घटनेने केकेच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, त्यावरून टीएमसी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

गायक केके याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ( Singer KKs body autopsy ) करण्यात येणार आहे. गायकाच्या डोक्यावर जखमेचे ठसे आढळून आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भाजपने पश्चिम बंगाल प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात, राज्यातील सत्ताधारी पक्ष टीएमसीने केकेच्या ( politicizing KKs death ) मृत्यूवर राजकारण करणे थांबवण्यास सांगितले आहे.

केकेच्या मृत्यूवरून भाजप आणि ममता बॅनर्जी आमने-सामने-केकेच्या मृत्यूवरून भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी समोरासमोर आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. टीएमसीवर निशाणा साधत भाजपचे प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मैफलीत 7 हजार प्रेक्षक सहभागी झाले होते. तर कॉन्सर्ट हॉलची क्षमता केवळ 3 हजार लोकांची असल्याचे त्यांनी सांगितले. केकेला येथे जनतेने त्यांना वेढले होते. तेथे व्हीआयपी व्यवस्थाही नव्हती.

टीएमसीचा भाजपवर पलटवार- कोलकाता प्रदेश सरचिटणीस कुणाल घोष यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने गिधाडांचे राजकारण त्वरित थांबवावे, असे घोष यांनी म्हटले आहे. ही एक दुःखद घटना आहे. त्याचे राजकारण केले जात असल्याची टीएमसीने टीका केली आहे.

केके यांना गन सॅल्युट -पश्चिम बंगालमध्ये रवींद्र साजनमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने केके यांना गन सॅल्युट दिला आहे. गायक केके यांच्यावर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा-नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ई़डीचे समन्स

हेही वाचा-Goa CM On Conversion : 'पावसाळी अधिवेशनात धर्मांतरण बंदीचा कायदा आणणार'

हेही वाचा-Smriti Irani slams Arvind Kejriwal : सतेंद्र जैन यांची ईडी चौकशी; स्मृती इराणी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर साधला निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details