महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

BJP New State President : भाजपने चार राज्यांमध्ये भाकरी फिरवली, आंध्र तेलंगाणासह चार राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलले - सुनील जाखड

भाजप हायकमांडने आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब आणि झारखंडमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने या राज्यांमध्ये आपली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे.

BJP New State President
भाजपचे चार राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष

By

Published : Jul 4, 2023, 10:01 PM IST

नवी दिल्ली : आगामी विधानसभा आणि 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक पाहता भाजपने संघटनात्मक पातळीवर फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत मंगळवारी भाजप हायकमांडने आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब आणि झारखंडमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावांची घोषणा केली.

कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांकडे भाजपची कमान : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माजी केंद्रीय मंत्री डी. पुरंदेश्वरी यांची आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर विद्यमान केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. तेलंगणात आगामी काळात निवडणुका होणार आहेत. याशिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सुनील जाखड यांच्याकडे पंजाबची कमान सोपवण्यात आली आहे. तर झारखंडमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तेलंगणावर विशेष लक्ष : या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील भाजप हायकमांडने माजी राज्यमंत्री एटेला राजेंद्र यांची निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. यासोबतच नड्डा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या नियुक्त्यांना अंतिम रूप दिले असून त्या तत्काळ लागू होतील, असे पक्षाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे.

पंजाबमध्ये आणखी बदल होऊ शकतात : सुनील जाखड यांना पंजाबमध्ये भाजप अध्यक्ष बनवल्यानंतर राज्यात अनेक बदल होऊ शकतात. सुनील जाखड हिंदू आणि जाट समाजाचा चेहरा असल्याने त्याचा 2024 च्या निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे सुनील जाखड हे पंजाब काँग्रेसचेही अध्यक्ष राहिले आहेत. मात्र 2021 मध्ये कॉंग्रेस हॉयकमांडने त्यांच्याऐवजी चरणजित सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री केल्यामुळे संतप्त झालेल्या सुनील जाखड यांनी काँग्रेसला अलविदा केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा :

  1. Monsoon Session 2023 : 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत

ABOUT THE AUTHOR

...view details