इरोड (तामिळनाडू) : तामिळनाडूतील इरोडजवळ एका 54 वर्षीय केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या जीभेला साप चावल्याने तो जखमी झाला. रूग्णालयाशी जेव्हा संपर्क साधल्या गेला तेव्हा त्याला तेथे उपचार मिळाल्याचे सांगितले गेले. रुग्णालयाने सांगितले की ते रुग्णाची वैयक्तिक माहिती देऊ शकत नाहीत आणि केवळ जागरूकतेसाठी ते उपचार तपशील देत आहेत. (prevent snake from coming in dream). (snake Superstition)
गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल : डॉ. सेंथिलकुमारन यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला जीभ कापल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला घेऊन आलेल्या लोकांकडे विचारपूस केली असता सापाने त्याची जीभ चावली असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णाची रक्तवाहिनी फुटल्यामुळे जिभेतून भरपूर रक्त बाहेर आले होते. तसेच सापाचे विष देखील शरीरात पसरू लागले होते. डॉक्टर सेंथिल कुमारन सांगतात की त्यांनी त्याच्यावर गंभीर अवस्थेत उपचार केले आणि त्याला वाचवण्यासाठी संघर्ष केला. जिभेतून बाहेर पडणाऱ्या रक्तामुळे त्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. त्याच वेळी त्यांनी जीभ पुन्हा जोडण्यासाठी अँटीडोट देऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळजवळ 7 दिवसांच्या उपचारानंतर ती व्यक्ती आता बरी होऊन घरी परतली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
स्वप्नात दिसायचा साप : रुग्णाच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला अनेकदा स्वप्नात साप दिसायचे. ही गोष्ट त्याने घरच्यांना सांगितल्यावर ते त्याला ज्योतिषाकडे सल्ल्यासाठी घेऊन गेले. जोतिषांनी त्यांना इरोड येथील एका धर्मोपदेशकाकडे पाठवले, जो सापाची पूजा करतो. धर्मोपदेशकाने स्वप्नातील सापाच्या लक्षणांबद्दल विचारले आणि तो रसेलचा वाइपर असल्याचा निष्कर्ष काढला. जर या सापाची प्रार्थना केली आणि क्षमा मागितली तरच सापाला शांती मिळेल असे धर्मोपदेशकाने सांगितले. त्याने ताबडतोब पूजेची व्यवस्थाही केली. घाबरलेल्या कुटुंबाने पूजेला सहमती दिली.
सापाकडून चावून घेतले : पूजेच्या खर्चाची वाटाघाटी केल्यावर, धर्मोपदेशक पूजेच्या दिवशी प्राणघातक विषारी रसेल वाइपरसह हजर झाला. पूजेनंतर पीडिताने सापासमोर आपली जीभ दाखवली आणि सूचनांनुसार तीन वेळा फुंकण्यास सांगितले. पहिली २ वेळा सहन केल्यावर तिसर्या वेळी सापाने जीभ चावली. हे पाहून पुजार्याने विष पसरण्यापासून वाचवू असे सांगून पीडिताची जीभ चाकूने कापली.
ही अंधश्रद्धा आहे : स्वप्नात साप दिसण्याच्या अंधश्रद्धेमागे काय आहे हे जाणून घेण्यासाठी किलपक्कम सरकारी मनोरुग्णालयाच्या संचालिका पूर्णा चंद्रिका यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या की, झोपण्यापूर्वी आपण काय विचार करतो ते आपल्या स्वप्नात येते. यात घाबरण्यासारखे काहीच नाही. स्वप्नासाठी पूजा करणे ही निराधार अंधश्रद्धा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.