अमृतसर ( पंजाब ) : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील ( Sidhu moose wala Murder Case ) आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला कडेकोट बंदोबस्तात दुपारी 12.30 वाजता पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आणण्यात ( Bishnoi appearance in Amritsar ) आले. लॉरेन्स बिश्नोईला सोमवारी संध्याकाळी मानसा न्यायालयात हजर केल्यानंतर अमृतसर पोलिसांनी 24 तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर घेतले. लॉरेन्स बिश्नोईला न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
ब्लॅक कमांडोज आणि चिलखती वाहने तैनात : लॉरेन्स येण्यापूर्वीच पंजाबच्या विविध सुरक्षा यंत्रणा येथे हजर होत्या. SSOC सुरक्षा कडक करण्यात आली ( Amritsar under tight security ) आहे. ब्लॅक कमांडो आणि चिलखती वाहने बाहेर तैनात आहेत. त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सिद्धू मुसेवाला हत्याकांडप्रकरणी बिश्नोई याची रात्रभर चौकशी करण्यात आली.
कडक सुरक्षाव्यवस्था :लॉरेन्स बिश्नोईला पोलिसांनी मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले. सकाळी लॉरेन्ससोबत पंजाब पोलिसांचा ताफा अमृतसर कोर्टाकडे रवाना झाला. त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. लॉरेन्सला न्यायालयात हजर केल्यानंतर अमृतसर पोलिसांनी आठ दिवसांची कोठडी मिळवली आहे. परिणामी, आता त्याला 6 जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. रिमांड मिळाल्यानंतर, त्याला पुन्हा एसएसओसी कार्यालयात नेण्यात आले, तेथे त्याची चौकशी केली जाईल.