महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशातील सात राज्यात 'बर्ड फ्लू'चा प्रसार, इतर राज्ये सतर्क - बर्ड फ्लू बातमी

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. तर इतर काही राज्यांतील पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

बर्ड फ्लू
बर्ड फ्लू

By

Published : Jan 10, 2021, 11:24 AM IST

जयपूर- आत्तापर्यंत देशातील सात राज्यात बर्ड फ्लू आजार पसरला असून हजारो पक्षांचे मृत्यू झाले आहेत. याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावरही झाला आहे. राजस्थानातील ११ जिल्ह्यात बर्ड फ्लू पसरला असून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोंबड्या, बदक, चिमणी, कावळे, बगळे, कबूतर यांच्यासह अनेक पक्ष्यांचेचे मृत्यू होत आहेत.

केंद्रीय पशुसंवर्धन विभागाची माहिती -

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. तर इतर काही राज्यांतील पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दिल्लीतही पक्षांचे मृत्यू झाले आहेत. या राज्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. केंद्रीय पशुसंवर्धन, मासेमारी आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.

पोल्ट्री पक्षांची कत्तल -

ज्या राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाला आहे. तेथील पोल्ट्रीतील कोंबड्या, इतर पक्षी आणि अंडी नष्ट करण्यात येत आहेत. काही राज्यात प्रवासी पक्षांचेही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने आजार दुसऱ्या ठिकाणी पसरू नये म्हणून प्रतिबंधित क्षेत्रे निर्माण केली असून परिस्थितीवर बारकाईने नियंत्रण ठेवण्यात येत आहे. राजस्थान सरकारने जोधपूर शहरातील प्राणी संग्राहालयात जाण्यास नागरिकांना बंदी घातली आहे.

महाराष्ट्रातही पक्षांचे मृत्यू होण्याच्या घटना -

महाराष्ट्रातील दापोली, ठाणे येथे पक्षांचे मृत्यू झाले आहेत. लातूर जिल्ह्यातही सुमारे साडेतीनशे कोंबड्या दगावल्या. त्यामुळे नागरिकांत भीत पसरली आहे. महाराष्ट्रात अद्याप बर्ड फ्लू आल्याचा कोणताही पुरावा नाही. ठाणे येथील पक्षांचे नमुने बर्ड फ्लू निगेटिव्ह आल्याचे पशुसंवर्धन मंत्र्यांनी सांगितले. तर इतर काही ठिकाणांवरी पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

केरळ राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाला असून शेकडो पक्षांचा मृत्यू झाला आहे. या संकटापासून पोल्ट्री व्यवसायिकांना सावरण्यासाठी केरळ सरकार धावून आले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना सरकार नुकसान भरपाई देणार असून राज्याच्या कॅबिनेट बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details