मुंबई -पीडित महिलेने जन्म दिलेल्या मुलाचा देखभाल आणि शिक्षणाचा खर्च देण्या वरून सहमती झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करण्यात आलेले तक्रार रद्द केली आहे. (Binoy Kodiyeri High Court relief) त्यामुळे बिनोय कोडियेरी त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामधील आरोपी आणि पीडित महिला आणि तिच्या मुलाचा डीएनए टेस्ट देखील करण्यात आला होता.
बिनोय कोडियेरी यांनी 80 लाख रुपये रुपयाची न्यायालयात जमा केली अशी माहिती न्यायालयाला दिली. सध्या मुंबईत स्थायिक झालेल्या या महिलेने सांगितले की बिनॉयवरील सर्व आरोप मागे घेण्यात आले असून खटल्याची कार्यवाही थांबवण्यात यावी अशी मागणी केली होती. 13 जून 2019 रोजी ओशिवरा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने बिनॉयवर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. तिने पुढे दावा केला की तिला नातेसंबंधातून आठ वर्षांचे मूल आहे आणि तिच्या मुलाचे संगोपन करण्यासाठी नुकसानभरपाईची मागणी केली.