नवी दिल्ली: बिल्किस बानो प्रकरणातील Bilkis Bano Case 11 बलात्कार आणि हत्या आरोपींच्या सुटकेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीCongress leader Rahul Gandhi यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर Prime Minister Narendra Modi निशाणा साधला. पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. या प्रकरणावरून राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी महिलांचा आदर हा भारताच्या प्रगतीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे म्हटले होते. 'नारी शक्ती'ला पाठिंबा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.
गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सोमवारी सुटका करण्यात आली. आता राहुल गांधी यांनी या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. राहुलने सोशल मीडियावर ट्विट करून लिहिले की, ज्यांनी 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या 3 वर्षाच्या मुलीची हत्या केली त्यांना 'आझादी के अमृत महोत्सवा' दरम्यान सोडण्यात आले. स्त्रीशक्तीच्या गप्पा मारणाऱ्या देशातील महिलांना काय संदेश देत आहेत? पंतप्रधान, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत आहे.