श्रीनगरजम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा भागात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले ( Terrorist attack on Bihari in Jammu Kashmir ) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारी मजुराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ( Bihari labour shot dead in Sadunara ) आहे. या घटनेनंतर परिसरातील बिगर स्थानिक मजुरांमध्ये घबराट पसरली आहे. त्याचबरोबर या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ठार झालेला मजूर बिहारचा रहिवासी आहे. या घटनेला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सदुनारा सोनावरी परिसरात ( Terrorist attack in Bandipora ) स्थानिक मजुराची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो बिहारचा रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे नाव जलील आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यात दोन बिहारी मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यावेळी सुमारे पाच बिहारी मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. या घटनांनंतर मोठ्या प्रमाणावर बिहारी मजुरांनी आपल्या राज्याची वाट पकडली होती. काश्मीरमध्ये या काळात परप्रांतीय मजुरांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.