महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Facebook Love Story: फेसबुकवर फुलली 'लव्ह स्टोरी'.. बिहारी पोराने पटवली फिनलँडची पोरगी.. आता केलं लग्न - बिहारी पोराने पटवली फिनलँडची पोरगी

जगातील कोणतीही शक्ती दोन प्रेमींना एक होण्यापासून रोखू शकत नाही. असेच एक प्रकरण बिहारमधून समोर आले आहे. बिहारी बाबू प्रणव यांनी फिनलँडच्या ज्युलियाशी संपूर्ण हिंदू रितीरिवाजांनी विवाह केला आहे. ही जोडी जितकी सुंदर दिसते तितकीच त्यांची लव्हस्टोरीही रंजक आहे. जाणून घ्या फिनलंडच्या ज्युलिया आणि कटिहारच्या प्रणव यांच्या एकतेची कहाणी..

BIHARI BOY MARRIED TO FINLANDS JULIA IN PURNEA
फेसबुकवर फुलली 'लव्ह स्टोरी'.. बिहारी पोराने पटवली फिनलँडची पोरगी.. आता केलं लग्न

By

Published : Feb 12, 2023, 3:13 PM IST

फेसबुकवर फुलली 'लव्ह स्टोरी'.. बिहारी पोराने पटवली फिनलँडची पोरगी.. आता केलं लग्न

पूर्णिया/कटिहार (बिहार): बिहारमधील पूर्णिया येथून व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमाची अनोखी कहाणी समोर आली आहे. या प्रेम आणि लग्नाची चर्चा संपूर्ण बिहारमध्ये आहे. फेसबुकवर दोघांचे प्रेम असे जडले की, फिनलँडची ज्युलिया सात समुद्र ओलांडून फिनलँडहून थेट बिहारला जाऊन तिच्या प्रियकराला भेटली. पूर्णियाच्या मंदिरात सात फेरे घेऊन ज्युलियाने बिहारी मुलासोबत लग्न केले आणि दोघांचेही अखेर मिलन झाले.

फिनलंडच्या ज्युलियाने कटिहारमधील मुलाशी लग्न केले: ज्युलिया आणि प्रणवची प्रेमकहाणी खूपच मनोरंजक आहे. दोघांची पहिली भेट फेसबुकवर झाली होती आणि इथेच त्यांच्या प्रेमाला बहर आला. ज्युलिया तिच्या कुटुंबासह कटिहारला पोहोचली. घरच्यांच्या संमतीने पूर्णियाच्या मंदिरात लग्न झाले. यावेळी ज्युलियाच्या कुटुंबातील सदस्यांसह तिचा फिनलँडमधील मित्र परिवारही मोठं लग्नासाठी हजर झाला होता.

फेसबुकवरील प्रेमानंतर लग्न : ज्युलिया फिनलंडमधील हेलसिंकी येथील रहिवासी आहे. तर प्रणव कुमार आनंद हा बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील लालियाही परिसरात राहतो. प्रणवने फिनलंडमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय ज्युलियाशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघं प्रियकर प्रेयसीचे मिलन झाल्याने आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता.

वधूने सातासमुद्रा पार करून संपूर्ण कुटुंबासह गाठले बिहार: प्रणवचे कटिहारमध्ये कॉस्मेटिकचे दुकान आहे. ज्युलियाला लवकरात लवकर प्रणवशी लग्न करायचे होते, पण प्रणव ज्युलियाकडे जाऊ शकला नाही. अशा परिस्थितीत ज्युलियाने भारतात येण्याचा निर्णय घेतला. ज्युलिया आपल्या कुटुंब आणि मित्रांसह फिनलंडहून भारतात आली होती. वधू ज्युलियासोबत तिच्या तीन बहिणी, भावजय आणि फिनलँडमधील मित्रांसह 8 जण होते.

व्हॅलेंटाईन वीकवरील लग्न ठरले संस्मरणीय :दोघांचे लग्न पूर्णिया येथील मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार झाले. लग्नानंतर, कटिहारच्या लालीही परिसरातील वधू प्रणवच्या घरी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान स्थानिक लोकांनी या खास लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. ज्युलिया आणि प्रणव या दोघांच्याही कुटुंबीयांनी दोघांचे लग्न लावून दिले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये झालेले हे लग्न सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होत आहे.

आम्ही दोघं फेसबुकवर भेटलो. आधी आमची मैत्री झाली. नंतर आम्ही प्रेमात पडलो. जेव्हा प्रेम फुललं, तेव्हा ज्युलिया इथे आली. त्यानंतर आम्ही दोघांनी पूर्णियातील एका मंदिरात लग्न केलं आणि इथे रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं. या लग्नामुळे आमच्या कुटुंबातील कोणालाही काही आक्षेप आहे.- प्रणव, वर

हेही वाचा: Pandit Dhirendra Shastri Marriage : बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीचं ठरलं लग्न.. कोण आहे होणारी नवरी? म्हणाले, 'लवकरच..'

ABOUT THE AUTHOR

...view details