महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bihar Rape : आणखी एक 'निर्भया'! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून रस्त्याच्या कडेला फेकले; 72 तासांनी आली शुद्ध - अल्पवयीनवर बलात्कार

दिल्लीतील निर्भया घटनेप्रमाणे बिहारमधील समस्तीपूरमध्ये 16 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. तीन जणांनी मुलीचे शरीर जनावरांसारखे ओरबाडले. त्यानंतर तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. त्यानंतर ही मुलगी बेशुद्ध झाली. तीन दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर तिने पोलिसांना याची माहिती दिलीय.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2023, 10:53 AM IST

Updated : Aug 25, 2023, 5:24 PM IST

समस्तीपूर (बिहार) :बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आलीय. येथे आधी एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी रात्रभर बलात्कार केला. त्यानंतर तिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला. तीन दिवसांनी जेव्हा तिला रुग्णालयात शुद्ध आली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेली संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केलीय.

कोल्ड्रिंक देऊन बेशुद्ध केले : ही मुलगी आणि तिचे वडील 16 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजता समस्तीपूर स्टेशनवर उतरले. त्यावेळी स्टेशन परिसरात एक बोलेरो उभी होती. ड्रायव्हरशी बोलले असता त्याने त्यांना घरी घेऊन जातो असे सांगितले. बोलेरोमध्ये त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती बसली होती. चालकाने सांगितले की, हा सुद्धा प्रवासीच आहे. त्यानंतर वडील आणि मुलगी दोघेही त्या गाडीत बसले. मुक्तापूरजवळ त्या व्यक्तीने वडील आणि मुलीला कोल्ड्रिंक दिले. कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर दोघेही बेशुद्ध झाले.

  • मुलीला अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले : वडील आणि मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर चालकाने त्यांच्याकडून पैसे आणि मोबाइल घेतले. त्यांनी मुलीच्या वडिलांना बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून दिले. त्यानंतर चालकासह तिघांनी मुलीवर चालत्या वाहनात बलात्कार केला. बलात्कारानंतर त्यांनी मुलीला मुझफ्फरपूरच्या साक्रा पोलीस स्टेशन परिसरात अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले.

तिन्ही गुन्हेगारांना अटक : सकाळी आजूबाजूच्या लोकांनी रस्त्याच्या कडेला मुलगी पडेलेली असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर साक्रा पोलीस ठाण्याचे पोलीस आणि पुसा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वडील आणि मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पीडितेला शुद्ध आल्यावर तिने २३ ऑगस्ट रोजी महिला पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी तपासासाठी एक टीम तयार तयार केली. पथकाने याप्रकरणी कारवाई करत तीन गुन्हेगारांना अटक केली. आरोपींची बोलेरो गाडीही जप्त करण्यात आली आहे.

तीन गुन्हेगारांना बोलेरो गाडीसह अटक करण्यात आली. चौकशीत सर्वांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हे लोक समस्तीपूर, पाटणा, सीतामढी, मुझफ्फरपूर या स्थानकांवर प्रवाशांना टार्गेट करायचे. ते त्यांना अंमली पदार्थ देऊन लुटायचे. - विनय तिवारी, पोलीस अधीक्षक-समस्तीपूर

  • अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिलीय. वैशाली येथील मोहम्मद सलाउद्दीन, मुजफ्फरपूर येथील मोहम्मद अलाउद्दीन आणि सक्रा येथील यशवंत कुमार अशी या गुन्हेगारांची नावे आहेत. चौकशीनंतर अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. कॉफी शॉपमध्ये प्रेयसीवर बलात्कार, गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकर फरार
  2. मुंबईत चालत्या रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रिक्षा चालकास अटक
  3. धक्कादायक! शिक्षकाकडूनच शौचालयात 5 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
Last Updated : Aug 25, 2023, 5:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details