पाटणा (बिहार)Bihar quotas hikeजातप्रगणना अहवाल सर्वांच्या संमतीनं शक्य : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बिहार विधानसभेत जात आधारित आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बिहारमध्ये जातगणना सर्वांच्या संमतीनं शक्य झालीय. जुन्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, 33 वर्षांपूर्वी 1990 मध्ये माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी सर्वप्रथम जातीवर आधारित जनगणना सुचवली होती. त्यावेळी आम्ही पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांचीही भेट घेतली होती. मी बिहारचा मुख्यमंत्री असल्यापासून जातीनिहाय गणनेसाठी प्रयत्न करत होतो. पण सर्वांच्या सहमतीनं हे शक्य झालंय, असंही मुख्यमंत्री नितीश कुमार न्हणाले. तसंच विधानसभेत चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, जात जनगणनेच्या अहवालानंतर आता आरक्षण वाढवण्यासाठी चर्चा केली जाईल. या अधिवेशनातच आम्हाला यावर बदल घडवून आणायचा आहे. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वतंत्र 10 टक्के आरक्षण असेल.
बिहार सरकारचा आरक्षणाचा प्रस्ताव काय :बिहार सरकारचा प्रस्ताव मान्य झाल्यास, त्यानुसार बिहारमध्ये एससीसाठी असलेलं 16 टक्के आरक्षण वाढवून 20 टक्के केलं जाईल. एसटीसाठी उपलब्ध असलेलं एक टक्का आरक्षण वाढवून 2 टक्के करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अत्यंत मागासवर्गीय म्हणजेच ईबीसी आणि ओबीसी यांना मिळून 43 टक्के आरक्षण दिलं जाईल.