महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Diecast Models of Vehicles : हौशेला मोलं नसतं! 10 हजार वाहनांच्या डायकास्ट मॉडेल्सचा संग्रह, बिहारच्या वाहन प्रेमीचा अनोखा छंद

आसिफ सांगतात की, त्याच्या कलेक्शनमध्ये जुन्या बजाज स्कूटर्स ( old Bajaj Scooters ), लॅम्ब्रेटा ( Lambretta ), रॉयल एनफिल्ड ( Royal Enfield ) , बजाज बाइक्स ( Bajaj Bikes ) , केटीएम ( KTM ) , होंडा ( Honda ) , दुचाकींमध्ये हिरो होंडा ते बीएमडब्ल्यू, ऑडी, रोल्स रॉइस, पोर्श, चारचाकी वाहनांमध्ये अॅम्बेसेडरदेखील उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यांनी जगभरातील अनेक देशांतून ही मॉडेल्स मिळविली आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते मॉडेल्स गोळा करत आहेत.

वाहनांच्या डायकास्ट मॉडेल्सचा संग्रह
वाहनांच्या डायकास्ट मॉडेल्सचा संग्रह

By

Published : Apr 15, 2022, 5:16 PM IST

पाटणा -विविध वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असलेले व्यक्ती तुम्ही पाहिले असतील. कुणी छंदात आगपेटी, कुणी स्टॅम्प, कुणी नाणी गोळा करतो. पण राजधानी पटना येथील अशोक राजपथ येथे राहणारा आसिफ वासी हे वाहनांचे डायकॉस्ट मॉडेल ( diecast models of vehicles ) गोळा करतात. आसिफ यांना कार, बाईक, विमाने, सायकल आणि रिक्षांचे डायकास्ट मॉडेल्स गोळा करण्याचा छंद आहे. त्यासाठी त्यांनी जगभरातील अनेक देशांतून ही मॉडेल्स मिळविली आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते मॉडेल्स गोळा करत आहेत.

दहा हजार डायकास्ट मॉडेल्स उपलब्ध- आसिफ वासी यांना लहानपणापासूनच वाहनांचे प्रचंड आकर्षण होते. ते सांगतात की, लहानपणी त्यांना या वाहनांची छायाचित्रे पेपरमध्ये दिसायची. तेव्हा ते वाहनांचे छायाचित्रे कापून काढायचे. या छंदाचे हळूहळू आवडीमध्ये रूपांतर झाले. मात्र, तेव्हा सर्व कंपन्या वाहनांचे डायकास्ट मॉडेल्सही बनवतात हे त्याला माहीत नव्हते. ही माहिती मिळताच त्यांनी गोळा करण्यास सुरुवात केली. देशात आणि विदेशात डायकास्ट मॉडेल्सची माहिती मिळेल तिथे ते विकत घ्यायचे. आज त्यांच्याकडे डायकास्ट मॉडेल्ससह सुमारे दहा हजार विविध प्रकारची वाहने उपलब्ध आहेत.

अनेक कंपन्यांचे मॉडेल्स उपलब्ध- आसिफ सांगतात की, त्याच्या कलेक्शनमध्ये जुन्या बजाज स्कूटर्स ( old Bajaj Scooters ), लॅम्ब्रेटा ( Lambretta ), रॉयल एनफिल्ड ( Royal Enfield ) , बजाज बाइक्स ( Bajaj Bikes ) , केटीएम ( KTM ) , होंडा ( Honda ) , दुचाकींमध्ये हिरो होंडा ते बीएमडब्ल्यू, ऑडी, रोल्स रॉइस, पोर्श, चारचाकी वाहनांमध्ये अॅम्बेसेडरदेखील उपलब्ध आहेत. याचबरोबर फेरारी, फियाट, ह्युंदाई, मारुती या चारचाकींचे मॉडेल्स उपलब्ध आहेत. याशिवाय सायकलमध्ये एव्हॉन, हिरो, हरक्यूलिसचे अनेक मॉडेल्स ( Bihar Man collects diecast models ) आहेत. दुबई एअर, टर्किश एअरलाइन, एअर इंडिया तसेच इतर अनेक एअरलाईन्सच्या विमानांचे डायकास्ट मॉडेल माझ्याकडे आहेत, असे ते सांगतात. हे मॉडेल्स गोळा करण्यासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत.

डायकास्ट मॉडेल म्हणजे काय -डायकास्ट मॉडेल हे रस्त्यावरील वाहनांची प्रतिकृती आहेत. ते खेळण्यासारखी नसतात. कोणतीही कंपनी आपली वाहने रस्त्यावर येण्यापूर्वी मॉडेल बनवते. लोकांना त्यांच्या प्रत्येक पैलूची माहिती मिळावी हा उद्देश आहे. हे मॉडेल फक्त आकाराने लहान आहेत. पण त्यात इंधन टाकले तर ते धावूही शकतात.

डायकॉस्ट ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था - या सर्व मॉडेल्सला पद्धतशीरपणे ठेवण्यासाठी आसिफ यांनी एक खास शो केस बनवला आहे. जेणेकरुन त्याचे कोणतेही नुकसान होऊ नये. आसिफला ही मॉडेल्स रोज साफ करायला खूप वेळ लागतो. डायकास्ट मॉडेल्स गोळा करणारा आसिफ हे बिहारमधला एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे सध्या जवळपास दहा हजार मॉडेल्स आहेत. जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत आणखी मॉडेल्स गोळा करत राहू, असा विश्वास ते बोलून दाखवितात.

हेही वाचा-Exclusive Interview Asaduddin Owaisi - 27 वर्षांपासून भाजप गुजरातमध्ये जिंकत नसून काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे विजयी-असुद्दीन ओवेसी

हेही वाचा-cow smuggling mafia arrest : ईशान्य भारतात गोवंशची तस्करी; आसाम पोलिसांकडून युपीमध्ये माफियाला अटक

हेही वाचा-Hanuman Janmotsav : हनुमान जयंतीला घडत आहेत हे शुभ योग, राशीनुसार मंत्रांचा जप करा, संकटांपासून मिळेल मुक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details