महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

घरात एकच बल्ब, मजुराला तब्बल 1 कोटी 29 लाखाचं बिल; वीज वितरण कंपनीच्या कारभारानं मजूर हादरला - ग्राहक मंचाचे अध्यक्ष

Labour Got 1crore Electricity Bill : मजुराच्या घरात एकच बल्ब असताना वीज वितरण कंपनीनं तब्बल 1 कोटी 29 लाख रुपयाचं बिल दिलं. त्यामुळं मजुराला मोठा धक्का बसला आहे.

Labour Got 1crore Electricity Bill
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 2:25 PM IST

पाटणा Labour Got 1 Crore Electricity Bill: वीज विभागानं मजुराला तब्बल 1 कोटी 29 लाखाचं वीज बिल दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मुशाहारी इथं घडली आहे. मुशाहारी इथल्या मनिका परिसरातील इथं जमीर अन्सारी हा मजूर असलेल्या ग्राहकाला हे बिल देण्यात आलं आहे. जमीर अन्सारी यांनी ग्राहक मंचाचे अध्यक्ष अजयकुमार पांडे यांच्याकडं तक्रार केली आहे. अजयकुमार पांडे यांनी पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता श्रावणकुमार ठाकूर यांना याबाबत माहिती दिली. याब्बत तपासणी केली असता, बिल चुकीचं असल्याचं स्पष्ट झालं.

मजुराला तब्बल 1 कोटी 29 लाखाचं बिल

"मीटर बसवणाऱ्या व्यक्तीची माहिती मागवण्यात आली आहे. चुकीचं मीटर जाणीवपूर्वक बसवलं असेल, तर गुन्हा दाखल करण्यात येईल. चौकशी करून 24 तासात अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत" - श्रवणकुमार ठाकूर, कार्यकारी अभियंता

बिल पाहून मजुराला बसला धक्का :मजुराला तब्बल 1 कोटी 29 लाख रुपयाचं वीजबिल आल्यानं बिहारमध्ये चांगलीच चर्चा सुरू होती. हे बिल पाहून मजूर जमीर अन्सारी यांना धक्काच बसला. कार्यकारी अभियंता श्रावण कुमार यांनी सहाय्यक विद्युत अभियंत्यांना या वीज बिलाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत अनियमितता उघडकीस आल्याचं वीज वीतरण कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर तासाभरात बिलात सुधारणा करण्यात येऊन 1 कोटी 29 लाख 846 रुपयांचे बिल थेट 33 हजार 378 रुपये करुन देण्यात आलं आहे.

स्मार्ट मीटरनं डिसेंबर महिन्यात 36,45,488 युनिट वीजवापर दाखवला. त्याचं 1 कोटी 29 लाख 846 रुपयांचं बिल आम्हाला पाठवण्यात आलं. आमच्या घरात एकच बल्ब आहे - जमीर अन्सारी, ग्राहक

स्मार्ट मीटर बसवण्यात आल्यानं झाला घोळ :"डिसेंबर 2022 पासून फेब्रुवारी 2023 पर्यंत 42 युनिट्सचा वापर झाला होता. तर मार्च ते जून या कालावधीत 331 युनिट्स वीज वापरण्यात आल्यानं ​​सरासरी बिल तयार करण्यात आलं. जुलैमध्ये 327 युनिट, ऑगस्ट 64 युनिट आणि सप्टेंबरमध्ये 67 युनिट वीजवापर झाल्याची नोंद वीज वीतरण विभागानं केली आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सामान्य मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सामान्य मीटरमध्ये वापरलेल्या युनिट्सची नोंद स्मार्ट मीटरमध्ये केली" अशी माहिती जमीर अन्सारी यांनी यावेळी दिली.

स्मार्ट मीटर बसवणाऱ्या संस्थेला नोटीस :मजूर जमीर अन्सारी यांना 1 कोटी 29 लाख वीजबिल दिल्यानं वीज वितरण विभागावर चांगलीच टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंता श्रावणकुमार ठाकूर यांनी "हे बिल दुरुस्त करण्यात आलं आहे. ग्राहकाला मागील थकबाकीसह 33 हजार 378 रुपयांचं बिल भरावं लागणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या एजन्सीला कारणं दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे" असं सांगितलं आहे.

हेही वाचा :

  1. वीज कनेक्शन तोडायला गेलेल्या वीज वितरण कर्मचाऱ्याला जबर मारहाण
  2. Power plant blast: वीज वितरण कंपनीच्या पॉवर स्टेशनमध्ये स्फोट; कुठलीही जीवितहानी नाही
  3. Electricity Bill Subsidy : उद्योजकांना मिळणारे वीज अनुदान द्या, अन्यथा...

ABOUT THE AUTHOR

...view details