छपरा : बिहारमधील बनावट दारू प्रकणामुळे ( Bihar Hooch Tragedy ) आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आहे. या मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आहे. गुरुवारी विरोधी पक्षनेते विजय सिन्हा, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सम्राट चौधरी, माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने छपराला भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन मृत्यूचे कारण आणि तेथे सुरू असलेल्या पोलिस कारवाईचा आढावा घेतला. आज भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार असल्याची शक्यता आहे.( Bihar Hooch Tragedy 53 People Died )
चौकीदार निलंबित :गुरुवारी सारणचे डीएम राजेश मीना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, दारू प्यायल्याने २६ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत पोलिसांनी 126 जणांना अटक केली आहे. डीएमने कालपर्यंत ५१ जणांना अटक केल्याची माहिती दिली होती. येथे पोलीस अधीक्षक संतोष कुमार यांनी सांगितले की, मशरकचे एसएचओ रितेश मिश्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. तर एका चौकीदारालाही निलंबित करण्यात आले आहे. मरहौरा डीएसपीवर विभागीय कारवाईची शिफारसही करण्यात आली आहे.
बनावट दारूमुळे मृत्यू : तेजस्वी यादव म्हणाले की, 2016 ते 2020 या कालावधीतील एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, भाजपशासित राज्यांमध्ये बनावट दारूमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ते म्हणाले की, खासदार दानिश अली यांनी देशभरातील बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी मागितली होती. याला उत्तर देताना गृह राज्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की ,2016 ते 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, बनावट दारूमुळे सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात झाले ज्यात 1214 लोकांचा मृत्यू झाला. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकात ९०९ लोकांचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये ७२५, हरियाणामध्ये ४७६, गुजरातमध्ये ५० आणि बिहारमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे.