पाटणा : राजधानी पाटणा येथे 23 जून रोजी होणाऱ्या भाजप विरोधी पक्षांच्या बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. 23 जूनची विरोधी पक्षाची बैठक यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांवर कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सोपवली आहे.
भाजप विरोधी पक्षांच्या बैठकीची जोरदार तयारी 17 हून अधिक पक्षांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण :पाटणा सभेला 17 हून अधिक विरोधी पक्षांच्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सपा नेते अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेत्यांच्या आगमणाच्या प्रतिक्षेत विश्रामगृह विरोधी पक्षांची होणार महाआघाडी :काँग्रेसची प्रमुख भूमिका असलेल्या विरोधी पक्षांची महाआघाडी होणार असल्याने सर्वांच्या नजरा राहुल गांधींवर असणार आहेत. कर्नाटक मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत काँग्रेस नेत्यांच्या व्यस्ततेमुळे विरोधकांची पाटणा बैठक 19 मे रोजी घेण्याचा प्रस्ताव होता, तेव्हा ती होऊ शकली नाही. राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यामुळे 12 जूनपासून पाटण्यातील विरोधकांची बैठक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. त्यावेळी नितीश कुमार यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या विनंतीवरून कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. यावेळी नितीश कुमार 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ऐतिहासिक सभेसाठी जोरदार तयारी करत आहेत.
नेत्यांच्या आगमणाच्या प्रतिक्षेत विश्रामगृह या ठिकाणी करण्यात आली आहे पाहुण्यांची व्यवस्था :राज्याच्या अतिथीगृहात मुख्यमंत्री आणि इतर पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाटणा सर्किट हाऊसही पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. येणाऱ्या मान्यवरांना बिहारचे पदार्थ दिले जातील. पटणामधील महत्त्वाच्या हॉटेल्सना स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पेये देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यावेळी नेत्यांना बिहारच्या स्वादिष्ट पदार्थांसह आपापल्या राज्यांचे पदार्थही दिले जातील. बिहारचे मुख्यमंत्री आदरातिथ्य करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. याआधी येथे झालेल्या सर्व मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्यांची मेजवानी करण्याची पद्धत प्रत्येकाने पाहिली आहे. ही 2024 च्या मोठ्या लढाईची तयारी आहे - संजय गांधी आमदार
प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती :सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती भाजपला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी मदत करणारी ठरणार असल्याचे बिहारचे अर्थमंत्री विजय कुमार चौधरी यांनी सांगितले. विरोधक एकजुटीने लढले तर भाजपला केंद्रात पुन्हा सत्तेत येणे शक्य नाही, असे संपूर्ण देशाचे मत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला आशा आहे की विरोधी एकजुटीत यश येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेससोबत विरोधी पक्षांचा हवा समन्वय :गेल्या वर्षी नितीश कुमार एनडीए सोडून महाआघाडीत सामील झाले. त्यानंतर त्यांनी सरकार स्थापन केले. तेव्हापासून ते भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्यात गुंतले असल्याची माहिती बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांनी दिली. मात्र काँग्रेससोबत विरोधी पक्षांचा समन्वय असायला हवा. बहुतांश ठिकाणी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार असावा, यासाठी नितीशकुमार यांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -
- Nitish Kumar Met Sharad Pawar : लोकशाही वाचविण्यासाठी सोबत राहून काम करूया- शरद पवार
- Opposition Unity: नितीश कुमारांचे मिशन 2024! देशातील 'या' प्रमुख नेत्यांची घेतली भेट