महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये एनडीएला काठावरचे बहुमत; तेजस्वी यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगले - तेजस्वी यादव लेटेस्ट न्यूज

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. एनडीएला काठावरते बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. एनडीएने म‌ॅजिक फिगरचा आकडा पार करत 125 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनला 110 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

बिहार
बिहार

By

Published : Nov 11, 2020, 7:13 AM IST

Updated : Nov 11, 2020, 1:37 PM IST

पाटणा - कोरोना महामारीच्या काळता झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते. 243 मतदारसंघाच्या झालेल्या या निवडणुकीत एनडीएला काठावरचे बहुमत मिळाले आहे. तर राष्ट्रीय जनता दल सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. एनडीएने 125 जागा मिळवल्या आहेत. तर यूपीएला 110 जागांवर समाधान मानावे लागले.

कोणाला किती जागा?

भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर जनता दल (यू) 43, हिंदुस्तान आवाम मोर्चा (सेक्युलर) आणि विकासशील इन्सान पार्टीने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 110 जागांवर विजय मिळवला. यात आरजेडीला 75, काँग्रेस 19, सीपीआय (मा-ले) 12, सीपीएम आणि सीपीआयला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर एमआयएमला 5 जागा मिळाल्या आहेत. तर बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला. बहुमतासाठी 122 ही म‌ॅजिक फिगर आहे.

तेजस्वी यांची जोदार टक्कर

निवडणुकीत तेजस्वी यादवांच्या राजदने नितीश कुमारांना जोरदार टक्कर दिली. अटीतटीच्या या निवडणुकीत एनडीएचा विजय झाला असला तरी, तेजस्वी यांच्या रूपाने बिहारला एक तरूण नेता मिळाला आहे. एनडीएसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितिश कुमार आणि केंद्रीतील मोठे नेते प्रचारात उतरले होते. तर महागठबंधनसाठी तेजस्वी यांनी एकहाती प्रचार केला होता. तेजस्वी यादव यांनी एनडीएसमोर तगडं आव्हान निर्माण करण्यात यशस्वी झाले. तर बिहारच्या विधानसभा निवडणुकीत थेट एन्ट्री घेत मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी बिहारच्या जनतेला भावल्या नाही.

पहाटेपर्यंत सुरू होती मतमोजणी

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी आयोगाने काही नियम बदलले होते. यामुळे मतमोजणीत उशीर झाला. आज पहाटे निवडणुकीचे निकाल हाती आले आहे. बिहारमधील एकूण चित्र स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत बिहारमधील जनतेचे आभार मानले आहेत.

हेही वाचा -बिहारमध्ये भाजपप्रणित रालोआला पूर्ण बहुमत; १२५ जागांवर विजय

Last Updated : Nov 11, 2020, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details