पाटणा :माणुसकीला लाजवेल अशी घटना बिहारमध्ये घडली आहे. स्थानिक गुंडांनी मागासवर्गीय महिलेला विवस्त्र करून मारहाण केली. त्यानंतर नराधमांनी तिच्या तोंडात लघवी केली. मारहाणीनंतर गंभीर अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही धक्कादायक घटना पाटणातील खुसरुपूर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर मागासवर्गीय समाजात भीतीचे वातावरण आहे.
पळ काढल्यानं वाचला जीव-पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री दहा वाजता गावातील एक गुंड त्याचा मुलगा अंशू आणि चार साथीदारांसह तिच्या घरी अचानक आला. त्यानंतर गुंडांनी महिलेला जबरदस्तीने त्यांच्या घरी नेले. महिलेच्या अंगावरील कपडे काढून तिला गुंडांनी काठ्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता गुंडाने आपल्या मुलाला महिलेच्या तोंडात लघवी करण्यास सांगितले. या घटनेने महिलेला धक्का बसला आहे. जीव वाचवण्यासाठी पीडित महिला तिथून पळून गेली.
पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत तिच्यावर उपचार सुरू आहेत - सियाराम यादव, एसएचओ, खुसरुपूर.
नेमके वादाचे कारण काय-पैशाच्या व्यवहारावरून वाद झाल्याचे पीडितेने सांगितले. पीडितेच्या कुटुंबातील एका व्यक्तीनं सांगितलं की, महिलेनं गुंडाकडून व्याजावर 1500 रुपये उधारीनं घेतले होते. पीडितेनं व्याज आणि मुद्दल रक्कमही परत केली. यानंतरही अधिक रक्कम थकबाकी असल्याचा गुंडाचा दावा होता. पैसे न दिल्यास महिलेला गावात नग्नावस्थेत फिरायला लावू, अशी धमकीही देण्यात आली.शनिवारी सकाळीदेखील पीडितेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. पीडितेच्या दाव्यानुसार तिने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली होती. पोलिसांनी केवळ चौकशी केली. पण कोणतीही कारवाई न करता आरोपीला मोकळे सोडले. पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर संतापलेल्या आरोपीनं पीडितेला मारहाण केली.
- मध्यप्रदेशमध्येही मागासवर्गीयावर अशाच पद्धतीनं अन्याय झाल्यानं मध्यप्रदेश सरकार अडचणीत सापडले होते. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पीडित व्यक्तीचे पाय धुऊन माफी मागितली होती.
हेही वाचा-
- Suspected Ghost : अघोरी प्रकार! भूत असल्याच्या संशयातून महिलेला मारहाण, स्मशानातील राख लावली खायला, गुन्हा दाखल
- Jalna Crime News: बकऱ्या चोरी करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर चोरानं केल धक्कादायक कृत्य, एक जण ताब्यात