दिल्ली - नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 राज्यांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आहे. शेजारच्या उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा स्वबळावर सरकार स्थापन केल्यानंतर भाजपची नजर आता बिहारकडे आहे. बिहारमध्ये आरजेडीसोबत दीड वर्षांचा काळ सोडला तर जवळपास 17 वर्षांपासून भाजप जेडीयूसोबत आघाडी करून सरकार चालवत आहे. दरम्यान, जेडीयूपेक्षा जास्त जागा असल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच आहेत. ( Nitish Kumar will become the Vice President ) त्यामुळेच आता नितीशकुमार यांना केंद्रात पाठवून बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. तसेच, नितीश कुमार यांच्या सुरक्षित बाहेर पडण्याची तयारीही अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे.
27 वर्षांपासून त्यांची भाजपसोबत युती - मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वयाची ७१ वर्षे ओलांडली आहेत. ते सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले असून गेल्या 27 वर्षांपासून त्यांची भाजपसोबत युती आहे. ( Nitish Kumar will go into the politics of the center ) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार यांना आघाडी आणि सरकारमध्ये सर्व अलबेल वाटत नाही. 43 जागा कमी होऊनही भाजपने नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली. मात्र, भाजप नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे नितीशकुमार अस्वस्थ आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अडचणीत भर पडली आहे. यूपीतील विजयानंतर भाजप नेत्यांचे मनोधैर्य वाढले असून ते आता तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाहीत असही बोलले जात आहे.
जुलै महिन्यात उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक - भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते नितीश सरकारमधील भाजप कोट्यातील मंत्र्यापर्यंत ते सरकारच्या धोरणांवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. दारूबंदी, भ्रष्टाचार आणि बेलगाम गुन्हेगारीमुळे नितीश भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. नितीश आणि प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक झाली आणि त्यानंतर नितीश कुमार यांच्याबद्दलच्या चर्चेला जोर आला आहे. नितीशकुमार हे राष्ट्रपतीपदाचे प्रबळ दावेदार आहेत, पण राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर या दाव्यांतील हवा बाहेर आली. आणि पुन्हा एकदा भाजपचे पारडे जड झाले. नितीशकुमार यांना पुन्हा तडजोडीच्या मोडमध्ये यावे लागले. जुलै महिन्यात उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असून त्यासाठीही नितीशकुमार यांचे नाव चर्चेत आहे.