नवी दिल्ली - देशात भाजपा विरुद्ध तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी विविध राज्यातील नेते एकत्र येत भेटी गाठी घेत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही विविध राज्यात जावून प्रमुख विरोधीपक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद Nitish Kumar Meet Sharad Pawar delhi पवारांची भेट घेऊन चर्चा केली. पवारांच्या दिल्लीच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. या भेटीमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नितीश कुमार यांनी भाजपापासून काडीमोड घेत बिहारमध्ये नवी आघाडी स्थापन केली. आरजेडी आणि काँग्रेससह अन्य छोट्या पक्षांना सोबत घेत त्यांनी आघाडी करीत पुन्हा मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राखले. त्या दिवसापासूनच त्यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणे सुरू केले आहे. विविध राज्यांच्या प्रमुख नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आजच त्यांनी दिल्लीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (एम-एल) सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य General Secretary Dipankar Bhattacharya यांची भेट घेतली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी एकजुटीसाठी काम करण्यासाठी नितीश कुमार सोमवारी दुपारपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री Nitish Kumar in Delhi यांनी देशातील अनेक डाव्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली.