महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bihar Boy Buy Audi Car औरंगाबादच्या तरुणाने युट्यूबच्या माध्यमातून कमावले पैसे, खरेदी केली ऑडी कार - खरेदी केली ऑडी कार

औरंगाबादच्या तरुणाने आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लाखो रुपयाची कमाई केली. इतकेच नाही तर त्याने महागडी ऑडी कार खरेदी केली. हर्ष राजपूत असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने धाकड हे युट्यूब चॅनेल सुरू केले होते.

ihar Boy Buy Audi Car
हर्ष राजपूत

By

Published : Jan 17, 2023, 8:55 PM IST

औरंगाबाद -बिहारच्या तरुणाने आपल्या युटूब चॅनलच्या माध्यमातून ऑडी खरेदी केल्याचे पुढे आले आहे. या तरुणाने युटूबवर आपले चॅनेल काढून त्या माध्यमातून पैसे कमावले आहेत. तरुणाने युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावून त्यातून ऑडी कार खरेदी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हर्ष राजपूत असे त्या तरुणाचे नाव आहे.

सोशल माध्यम पैसे कमावण्याचे साधनआता सोशल माध्यम देखील पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. सोशल माध्यमातून अनेक तरुण पैसे कमावत आहेत. त्यातच बिहारचा हर्ष राजपूत हा औरंगाबाद जिल्ह्यातील जसोईया गावाचा रहिवाशी आहे. त्याने आपला पहिला व्हिडिओ 2020 ला सोशल माध्यमात अपलोड केला होता. त्यानंतर त्याच्या व्हिडिओला सोशल माध्यमात चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यातून हर्ष राजपूतला दरमहिन्याला युट्यूबकडून पैसे मिळत होते. हर्ष राजपूतने युट्यूबच्या माध्यमातून कमावलेल्या पैशातून ऑडी कार विकत घेतली.

कोरोना काळात सोशल माध्यमातून कमावले लाखो रुपयेकोरोना काळात हर्ष राजपूतने लाखो व्हिडिओ सोशल माध्यमात अपलोड केले होते. त्यातून त्याला लाखो रुपये मिळाले. कोरोना काळात अनेक लोकांचा रोजगार गेला होता. त्यातच हर्षला आपल्या व्हिडिओने सोशल माध्यमात वेगली ओळख दिली. फक्त ओळख दिली इतकेच नाही, तर त्याला युट्यूबच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाईही झाली. त्यातूनच त्याने ऑडीसारखी महागडी कार खरेदी केली.

कोण आहे हर्ष राजपूतहर्ष राजपूत याने सच्चिदानंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून आपली पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याने धाकड हे युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. त्याच्या एका व्हिडिओला 2 करोड नागरिकांनी पाहिले आहे. त्यामुळे तो नागरिकांच्या चांगलाच परिचयाचा झाला. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने घराघरात प्रसिद्धी मिळवली.

ABOUT THE AUTHOR

...view details