महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशात बालाघाट जिल्ह्यातील जंगलात चकमक, 3 नक्षलवादी ठार - जंगलात नक्षलींची शोधमोहीम जारी

मध्यप्रदेशात बालाघाट जिल्ह्यातील जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यातील एक नक्षलवादी अतिशय धोकादायक होता. पोलिसांनी त्याच्यावर बक्षीस ठेवले होते. या घटनेला पोलीस किंवा प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. कारण वरचे अधिकारी जंगलात घटनास्थळी आहेत. येथे राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मात्र तीन नक्षलवाद्यांच्या हत्येला दुजोरा दिला आहे.

मध्यप्रदेशात बालाघाट जिल्हा पोलिसांसोबत चकमकीत 3 नक्षलवादी ठार
मध्यप्रदेशात बालाघाट जिल्हा पोलिसांसोबत चकमकीत 3 नक्षलवादी ठार

By

Published : Jun 20, 2022, 2:23 PM IST

बालाघाट - जिल्ह्यातील नक्षलग्रस्त लांजी भागापासून 15 किमी अंतरावर असलेल्या खंडापाडी ग्रामपंचायतीच्या कांडला गावाच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. विस्तारा दलम प्लाटून 56 आणि दादेक्सा दलमच्या तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.


घटनास्थळी आयजी आणि एसपी उपस्थित - बालाघाटचे पोलिस अधीक्षक समीर सौरभ आणि आयजी संजय सिंह जंगलात उपस्थित आहेत. त्यामुळे याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या तीन नक्षलवाद्यांचे वय 35 ते 40 वर्षे दरम्यान आहे. त्यापैकी एका नक्षलवाद्यावर बक्षीसही लावण्यात आले आहे. ही चकमकीची घटना बहेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देतील अशी शक्यता आहे.

जंगलात शोधमोहीम सुरू - सूत्रांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र आणि छत्तीसगडला लागून असलेल्या लोधंगी परिसरात ही चकमक झाली. डोवरवेली चौकीवर तैनात असलेल्या हॉक फोर्सला जंगलात नक्षलवाद्यांची हालचाल असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक तेथून शोधासाठी निघून गेले. शोध मोहिमेदरम्यान तीन सशस्त्र नक्षलवादी जंगलात सापडले. जवान पाहून नक्षलवाद्यांनी वेगाने गोळीबार सुरू केला. यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत तीनही नक्षलवादी ठार झाले. पोलीस सध्या उर्वरित जंगल परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.

हेही वाचा - अग्निपथ योजना: सैन्याने जाहीर केली संपूर्ण अटी आणि शर्तींसह योजनेची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details