आज प्रवासी भारतीय दिवस
९ जानेवारी १९१५ या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आले. त्यानिमित्ताने या दिवसाचे आयोजन केले जाते. देशातील कोरोना साथीमुळे यंदा १६व्या प्रवासी भारतीय दिनाचे आयोजन ऑनलाईन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटन करतील. महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला.
शेतकरी आंदोलनाचा ४५वा दिवस
कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज ४५वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमांवर प्रमुख ४० शेतकरी संघटनांसह, देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आलेल्या थंडीच्या लाटेमध्येही हे शेतकरी सीमांवरतीच बसून आहेत. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, आणि एमएसपी लागू करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी ही आंदोलने सुरू आहेत.
पंतप्रधान मोदींची नीती आयोगातील तज्ञांशी बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नीती आयोगातील तज्ञांशी बैठक घेणार आहेत. आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्प पाहता अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. या बैठकीत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अन्य वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील.
सोनियांची वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत किसान आंदोलनावर चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.
वीज चोरीशी संबंधित विशेष लोक अदालत
उत्तर आणि वायव्य दिल्लीतील ७०लाख लोकसंख्येला वीजपुरवठा करणारी प्रमुख वीज कंपनी टाटा पॉवर डीडीएलकडून वीज चोरीशी संबंधित खटला चालवण्यासाठी आज ९ जानेवारी रोजी विशेष लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत विशेष लोक अदालत होणार आहे.
महाराष्ट्र हवामान