चंदीगड : अमृतपाल सिंग यांच्याबाबत सातत्याने अनेक खुलासे होत आहेत. पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग प्रकरणी नवा खुलासा केला असून, अमृतपाल सिंग एका वेगळ्या वेशात फरार झाल्याचे सांगितले आहे. आयजी डॉ. सुखचन सिंग गिल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, अटक केलेल्या अमृतपाल सिंगच्या साथीदारांनी पोलिसांसमोर कबुली दिली आहे की, अमृतपाल सिंगने आधी वाहन बदलले आणि कपडे बदलून नांगल अम्बिया गुरुद्वारा साहिब येथून ब्रेझा वाहनात गेले. त्यानंतर साथीदारांसह दोन मोटारसायकलवर पळून गेले.
ऑपरेशनमध्ये पंजाबमधील सर्व लोक मदत करत आहेत : या पत्रकार परिषदेत आयजी सुखचैन गिल यांनी सांगितले की, पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम आहे. मुख्यमंत्री भगवंत सिंह मान पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. ते म्हणाले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांना पंजाब बाहेरून मोठ्या प्रमाणात फोन आले आहेत. जिथे लोकांनी पंजाब सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या ऑपरेशनमध्ये पंजाबमधील सर्व लोक मदत करत आहेत. सोबतच या कारवाईत सर्व यंत्रणा मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कुणालाही बेकायदेशीर वागू देणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.