दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली आहे. मध्य वॉर्सातील मेरियट हॉटेलमध्ये ही भेट झाली. (Joe Biden visit to Poland) रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली आहे. शनिवारी (26 मार्च)रोजी ही भेट घेतली. यावेळी रशियन आक्रमणाचा एकजुटीने विरोध करत असल्याचा मुद्दा त्यांनी अदोरेखित केला.
रशियाची चढाई सौम्य? -युक्रेनवरील लढाई सौम्य करून रशियाच्या फौजा पूर्व युक्रेनमधील रशियाने पाठिंबा दिलेल्या युक्रेनच्या फुटीर प्रदेशांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे संकेत रशियाकडून देण्यात आले. राजधानी किव्हबाहेर रशियाने व्यापलेली गावे पुन्हा ताब्यात घेण्यासाठी युक्रेनच्या फौजा आक्रमक झाल्या आहेत.
आतापर्यंत १३६ मुलांचा मृत्यू -रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा शनिवारी ३१ वा दिवस होता. आतापर्यंत या संघर्षांत १३६ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या महाधिवक्ता कार्यालयाने दिली आहे. (Biden meets Ukraine's Foreign) गेल्या आठवड्यात मारिओपोलच्या एका सभागृहावर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 300 नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. हा निष्पाप नागरिकांवरील सर्वात क्रूर प्राणघातक हल्ला असल्याचे युक्रेनतर्फे सांगण्यात आले आहे.
बायडेन यांच्याकडून पोलंडचे कौतुक - जो बायडेन यांनी शनिवारी पोलंडची राजधानी वारसॉ येथे युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. रशियाचे आक्रमण सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कीवमधील उच्च पदस्थ अधिकारी यांच्यात वन-ऑन-वन चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलंडमध्ये युक्रेनच्या मंत्र्यांसोबत जो बायडेन यांची भेट रशियाला चिथावणी देणारी ठरू शकते. खरे तर युक्रेनमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण केल्याबद्दल रशिया आधीच अमेरिकेला दोष देत आहे.