युक्रेन :रशिया आणि युक्रेनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. युक्रेन सीमेजवळील नाटो सदस्य देश पोलंडमध्ये रशियाचे एक क्षेपणास्त्र पडल्याचे बातमी आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. ( Meeting After Missile Hits Poland ) मात्र, रशियाने असा कोणताही क्षेपणास्त्र हल्ला नाकारला आहे. ही बातमी खरी ठरली तर पोलंड हा नाटोचा सदस्य असल्यामुळे हे भयंकर युद्ध आता महायुद्धाचे रूप धारण करताना दिसत आहे. ( Biden Calls Emergency Meeting )
Russian Missile Hits Poland: महायुध्द भडकणार.. रशियन मिसाईल पोलंडमध्ये पडले.. दोन ठार.. अमेरिकेने बोलावली तातडीची बैठक
युक्रेन सीमेजवळील नाटो सदस्य देश पोलंडमध्ये रशियाचे एक क्षेपणास्त्र पडल्याचे बातमी आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावली आहे. ( Biden Calls Emergency Meeting ) ( Meeting After Missile Hits Poland )
रशियन क्षेपणास्त्र नाटो देश पोलंडमध्ये पडले :मंगळवारी रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक शहरांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ला केला. यामध्ये युक्रेनची राजधानी कीव, खार्किव, लिव आणि पोल्टेवा या शहरांवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यात रशियाची काही क्षेपणास्त्रे युक्रेन सीमेजवळ पोलंडमध्ये पडली, त्यात 2 जणांचा मृत्यू झाला. पोलिश मीडियानुसार, ही क्षेपणास्त्रे पोलिश गावात प्रोजेवोडोमध्ये पडली आहेत.पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रशियन क्षेपणास्त्र पडल्यानंतर पोलंड सरकारने रात्रीच संरक्षण परिषदेची तातडीची बैठक बोलावली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र या घटनेचा नकार दिला आहे. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे रशियन सरकारचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा भडका उडवण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचे रशियाने म्हटले आहे.
बिडेन यांनी नाटोची तातडीची बैठक बोलावली :त्याचवेळी या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी नाटो सदस्य देशांच्या प्रतिनिधींची तातडीची बैठक बोलावली आहे. बिडेन यांनी पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज दुदा यांच्याशी फोनवर बोलून संपूर्ण घटनेची माहिती मिळवली. पोलंडनेही कलम-४ चा वापर करून नाटो देशांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. नाटोमध्ये सामील सदस्य देश त्यांच्या सुरक्षेशी संबंधित विषयावर आपत्कालीन बैठक बोलावू शकतात.