भुवनेश्वर ( ओडिशा ) - भुवनेश्वरमध्ये विविध मागण्यासांठी 3 लाख वाहन चालकांनी हल्लाबोल केला आहे. ओडिशामधील राजधानीतील अनेक रस्त्यांवर आणि चौकाचौकात गणवेश परिधान केलेल्या वाहन चालकांची गर्दी झाली आहे. संपूर्ण भुवनेश्वर शहर वाहन चालकांनी भरलेले दिसू लागले आहे. ओडिशाच्या 30 जिल्ह्यांतील सुमारे 3 लाख चालक राजधानी भुवनेश्वरला पोहोचले आहेत.
भुवनेश्वरची लोकसंख्या 12 लाख आहे. तर आंदोलनासाठी आलेल्या वाहन चालकांची संख्या 3 लाख आहे. असे असले तर शहरात हिंसाचार झाल्याचे वृत्त नाही. मात्र, एवढ्या संख्येने शहरात आलेले वाहन चालक म्हणजे गुप्तचर यंत्रणेचे पूर्णपणे अपयश असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. गणवेशातील वाहन चालकांची एवढी मोठी गर्दी राजधानीत यापूर्वी कधीही दिसली नव्हती.
भुवनेश्वरची एकूण लोकसंख्या १२ लाख आहे. त्याचवेळी सुमारे तीन लाख वाहनचालक अचानक शहरात पोहोचले. शहराची काय अवस्था असेल याची कल्पना करा. ओडिशाच्या राजधानीत खाकी वर्दीतील सुमारे 3 लाख चालक आपल्या 11 मागण्या घेऊन शहरात पोहोचले आहेत. त्यांच्या मागण्यांमध्ये अपघात विम्याचाही समावेश आहे. अपघातात मृत्यू झाल्यास चालकाच्या कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी वाहन चालकांची मागणी आहे. यासह विविध 11 मागण्या घेऊन ( government fulfil 11 charter of demands ) वाहन चालक राजधानीत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही वाहन चालकांनी विविध मागण्यांसाठी असेच निदर्शने करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या संकटात ओडिशातील रस्त्यांवर वाहन चालक दिसत होते. ओडिशा ड्रायव्हर फेडरेशनच्या ( Odisha Drivers Mahasangh ) बॅनरखाली हजारो चालकांनी भुवनेश्वरमध्ये पायी मोर्चा काढला आहे. किमान वेतन, पेन्शन, विमा संरक्षण अशा १० मागण्या घेऊन चालकांनी पायी मोर्चा काढला आहे.