भोपाळ -चोला मंदिर परिसरात राहणाऱ्या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Woman commits suicide in Bhopal) केली. तिच्या डाव्या हाताच्या तळव्यावर लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये तिने कुटुंबाची माफी मागताना स्वत:च्या इच्छेनुसार आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच पतीच्या पासपोर्ट साइज फोटोवर 'मी बेवफा नाही' असे लिहिले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कुटुंबाच्या अनुपस्थितीत फासावर लटकले - एएसआय गजेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, इंदू उर्फ गुडिया साहू (35) ही मूळची गारतगंज, जिल्हा रायसेनची रहिवासी होती. 2019 मध्ये तिचा विवाह शिवनगर फेज-3 चोल मंदिर येथे राहणारे सुभाष साहू यांच्याशी झाला होता. सुभाष संगीत शिक्षक आहेत, तर इंदूही एका शाळेत शिक्षिका होती. गुरुवारी सकाळी सुभाष घराबाहेर पडले होते, तर त्यांचा मेहुणाही बाहेर गेला होता. दरम्यान, इंदूने घरात गळफास लावून घेतला. आजूबाजूच्या लोकांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी तिच्या कुटुंबियांना कळविले. दरम्यान, पतीसह कुटुंबीयही घरी पोहोचले.