महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bhind Cylinder Blast : एलपीजी सिलिंडरच्या स्फोटाने हादरले लग्नघर ; 3 निष्पाप बालकं ठार, 4 जखमी

किरकोळ निष्काळजीपणामुळे विवाह सोहळ्याच्या आनंदावर शोककळा पसरली. समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांच्या जेवणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना मध्य प्रदेशातील भिंडमध्ये घडली आहे. या घटनेत 3 निष्पाप मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

Bhind Cylinder Blast
भिंड सिलेंडरचा स्फोट

By

Published : Jun 10, 2023, 7:50 PM IST

भिंड (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशाच्या चंबळ प्रदेशात जेव्हा जेव्हा लग्न समारंभ किंवा मोठी मेजवानी आयोजित केली जाते तेव्हा तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते. भिंड जिल्ह्यात अनेकवेळा लग्नसमारंभात स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरमधून जाळ निघाल्याच्या किंवा सिलिंडरचा स्फोट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता जिल्ह्यातील गोरमी परिसरातून आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. येथील पुरा गावात लग्न समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण बनवत असताना एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन तीन निष्पापांचा मृत्यू झाला.

लग्न समारंभासाठी घरात ठेवले होते सिलिंडर : मिळालेल्या माहितीनुसार, काचनाव कला पंचायतीच्या पुरा गावात राहणारे अखिलेश काडेरे यांच्या घरी मुलाच्या लग्नासाठी नातेवाईक आले होते. 22 जूनला लग्नाची वरात निघणार होती. लग्नाच्या वातावरणात घरात सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी जेवणासाठी वापरलेले गॅस सिलिंडर घरात ठेवले होते. यातील एका सिलिंडरला सकाळी अचानक आग लागली आणि त्यानंतर त्याचा स्फोट झाला.

तीन निष्पाप मुलांचा मृत्यू :सिलिंडरचा स्फोट एवढा भीषण होता की यात संपूर्ण घराचे नुकसान झाले. लोकांना काही समजेपर्यंत घरातील 4 वर्षांचा कार्तिक, 6 वर्षाची भावना आणि 5 वर्षाची परी ही 3 मुले आगीत होरपळून जागीच ठार झाली. अन्य व्यक्ती अखिलेश काडेरे यांना ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले आहे, तर अखिलेश यांची पत्नी विमला आणि मुलगी पूजा आणि कुटुंबातील सदस्य मीरा यांच्यावर गोरमी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चार महिन्यांपूर्वीही झाला होता अपघात : घटनेची माहिती मिळताच एसडीओपी राजेश राठोड हे घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलीस घराला आग कशी लागली याचा तपास करत आहेत. उल्लेखनीय आहे की, 20 फेब्रुवारी रोजी कचनाव कलान गावात राहणाऱ्या अमर सिंह यांच्या घरात लग्न समारंभाच्या वेळी सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यात एकूण 12 जण भाजले होते. वराच्या आईसह 5 महिलांचा समावेश होता. दिल्ली एम्स मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

हे ही वाचा :

  1. Mumbai Fire News : मालाडमधील झोपडपट्टीला भीषण आग; 20 सिलिंडरचा ब्लास्ट, एकाचा मृत्यू
  2. Mobile Battery Blast : भयानक! मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन ६ वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details