महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bhau Beej : जाणुन घ्या, भाऊबीज सणाचे महत्व, मुहूर्त, पूजाविधी आणि कथा - Bhau Beej Festival

भाऊबीज (Bhau Beej) हा सण भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे आणि स्नेहाचे प्रतीक आहे. भाऊबीज हा सण भाई टिका, यम द्वितीया, भाऊ द्वितीया इत्यादी नावांनी साजरा केला जातो.Bhau Beej Festival Significance Muhurat Rituals and Story

Bhau Beej
भाऊबीज सण

By

Published : Oct 14, 2022, 6:02 PM IST

Updated : Oct 25, 2022, 9:41 PM IST

भाऊबीज (Bhau Beej) हा सण भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे आणि स्नेहाचे प्रतीक आहे. भाऊबीज हा सण भाई टिका, यम द्वितीया, भाऊ द्वितीया इत्यादी नावांनी साजरा केला जातो. भाऊबीज हा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. ही तारीख दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येते. या प्रसंगी बहिणी आपल्या भावांना टिळक लावतात आणि त्यांना दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धीची कामना करतात. तर भाऊ बहिणीला शगुनच्या रूपात भेटवस्तू देतो. भाई दूजच्या दिवशी मृत्यूचे देवता यमराज यांचीही पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी यमदेव आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवण करण्यासाठी आले होते.Bhau Beej Festival Significance Muhurat Rituals and Story

भाऊबीज तारीख आणि मुहूर्त :यंदाभाऊबीज 26 ऑक्टोंबर, गुरुवार रोजी आलेली आहे. तर भाऊबीज ओवाळण्याची वेळ दुपारी 14 वाजुन 44 मिनिटांनी सुरु होते आहे. व 15 वाजुन 26 मिनिटांनी संपत आहे. तरी देखील सायंकाळी निघणाऱ्या चंद्राच्या कोरेची पुजा करुन नंतरच भावाला ओवाळण्याची प्रथा रुढ आहे.

भाऊबीजेच्या काही मान्यता :धर्मग्रंथानुसार, कार्तिक शुक्ल पक्षाच्या दुसर्‍या दिवशी जेव्हा अपराह (दिवसाचा चतुर्थ भाग) येतो तेव्हा भाऊबीज साजरी केली जाते. द्वितीया तिथी दोन्ही दिवशी दुपारी आली तर दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी करण्याचा नियम आहे. याशिवाय दोन्ही दिवशी दुपारच्या वेळी द्वितीया तिथी आली नाही तरी, दुसऱ्या दिवशी भाऊदूज साजरी करावी. ही तीन मते अधिक लोकप्रिय आणि वैध आहेत. दुसर्‍या मान्यतेनुसार, कार्तिक शुक्ल पक्षातील मध्यान्ह (दिवसाचा तिसरा भाग) प्रतिपदा तिथी सुरू झाल्यास भाऊबीज साजरी करावी. तथापि, हे मत तर्कसंगत आहे असे म्हटले जात नाही. भाऊबीजच्या दिवशी दुपारनंतरच भावाला औक्षवान व भोजन द्यावे. याशिवाय यमपूजाही दुपारनंतर करावी.

भाऊबीज पूजा आणि विधी :हिंदू धर्मातील सण विधीशिवाय अपूर्ण आहेत. प्रत्येक सण विशिष्ट पद्धतीने आणि रीतीने साजरा केला जातो. जाणुन घेऊयात भाऊबीज साजरी करण्याच्या काय आहेत विधी. भाऊबीजच्या निमित्ताने बहिणी भावाच्या औक्षवान आणि आरतीसाठी ताट सजवतात. त्यात कुमकुम, सिंदूर, चंदन, फळे, फुले, मिठाई, सुपारी असे पदार्थ असावेत. या शुभ मुहूर्तावर भावाला या पाटावर बसवावे आणि बहिणींनी औक्षवान करावे. तिलक केल्यानंतर भावाला फुले, सुपारी, बताशे आणि काळे हरभरे देऊन, त्याची करून त्यांची आरती करावी. औक्षवान आणि आरतीनंतर, भावांनी त्यांच्या बहिणींना भेटवस्तू द्याव्यात आणि त्यांचे नेहमी रक्षण करण्याचे वचन द्यावे.

भाऊबीज संबंधित पौराणिक कथा : हिंदू धर्मातील सर्व सण आणि उत्सवांशी संबंधित पौराणिक श्रद्धा आणि कथा आहेत. त्याचप्रमाणे भाऊबीजशी संबंधित काही पौराणिक कथा आहेत. या प्राचीन कथा या सणाचे महत्त्व आणखी वाढवतात. प्राचीन मान्यतेनुसार, भाऊबीजच्या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले, तेव्हापासून भाऊबीज किंवा यम द्वितीयेची परंपरा सुरू झाली. सूर्याचे पुत्र यम आणि यमी हे भाऊ आणि बहीण होते. यमुनेला अनेकदा हाक मारून एके दिवशी यमराज यमुनेच्या घरी पोहोचले. यावेळी यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि टिळक करून सुखी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर यमराजांनी बहीण यमुना यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा यमुना म्हणाली की, दरवर्षी या दिवशी माझ्या घरी या आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला टिळक लावेल ती तुला घाबरणार नाही. बहीण यमुनेचे बोलणे ऐकून यमराज अतिशय प्रसन्न झाले आणि तिला आशीर्वाद दिला. या दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली. या दिवशी यमुना नदीत स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे कारण असे म्हटले जाते की, भाऊबीजच्या निमित्ताने यमुना नदीत स्नान करणाऱ्या बंधू-भगिनींना पुण्य प्राप्त होते.

भगवान कृष्ण आणि सुभद्रा यांची कथा :दुसर्‍या आख्यायिकेनुसार, भाऊबीजच्या दिवशी नरकासुर या राक्षसाचा वध करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परतले. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा यांनी फळे, फुले, मिठाई आणि अनेक दिवे लावून त्यांचे स्वागत केले. सुभद्राने डोक्यावर तिलक लावून भगवान श्रीकृष्णाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती. या दिवसापासून भाऊ दूजच्या निमित्ताने बहिणी भावांच्या कपाळावर टिळक लावतात आणि त्या बदल्यात भाऊ त्यांना भेटवस्तू देतात.

वेगवेगळ्या राज्यात भाऊबीज साजरी :भाऊबीज हा सण देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. खरं तर, भारतातील प्रादेशिक विविधता आणि संस्कृतीमुळे सणांची नावे थोडी बदलली असली तरी अर्थ आणि महत्त्व तेच आहे.Bhau Beej Festival Significance Muhurat Rituals and Story

Last Updated : Oct 25, 2022, 9:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details