महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झायडस कॅडिला कंपनीचे 'रेमडेसिविर' भारतीय बाजारात; कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपयुक्त - Zydus Cadila launches Remdesivir in India

झायडस कॅडिला या प्रतिष्ठित औषध कंपनीने भारतात 'रेमडॅक' नावाने कोरोनरील रेमडेसिविर औषध लॉन्च केले आहे. यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत औषधाचा पर्याय समोर आला आहे.

Zydus Cadila launches COVID-19 drug Remdesivir in India
झायडस कॅडिला कंपनीचे 'रेमडेसिविर' भारतीय बाजारात; कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपयुक्त

By

Published : Aug 13, 2020, 2:23 PM IST

Updated : Aug 13, 2020, 2:46 PM IST

नवी दिल्ली - झायडस कॅडिला या प्रतिष्ठित औषध कंपनीने भारतात रेमडॅक नावाने कोरोनरील रेमडेसिविर औषध लॉन्च केले आहे. यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत औषधाचा पर्याय समोर आला आहे.

या लसीची किंमत 2 हजार 800 रुपये (100मिग्रॅ) असणार असून कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे कंपनी प्रशासने सांगितले आहे. देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना मोठ्या विरतणाच्या साखळीमार्फत या औषधाचा मुबलक पुरवठा करणार असल्याचे झायडस कॅडिलाने सांगितले. देशातील सर्व कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना हे उपलब्ध करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आम्हाला कोरोनाच्या उपचारांमध्ये रुग्णांना सक्षम बनवायचे असून हे औषध सर्वांना परवडणारे असल्याचे कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी सांगितले. या महामरीच्या गंभीर काळात लस विकसित करणे, औषधांचे उत्पादन आणि उपचारांचे प्रमाण वाढवणे, रोग निदान करण्याविषयी चाचण्या उपलब्ध करून देणे किंवा नवीन उपचार पर्यायांचा शोध घेणे या गोष्टींवर कंपनीचे लक्ष केंद्रित असल्याचे पटेल म्हणाले.

यावर्षीच्या जून महिन्यात झायडस कंपनीने जीलेड सायन्सेस कंपनीसोब रेमडिसिविरचे उत्पादन घेण्याचा आणि विक्रीसंबंधी करार केलाय. याला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यची मान्यता दिल्याची माहिती पटेल यांनी दिली.

या ड्रगसाठी आवश्यक असणारे अ्ॅक्टिव्ह फार्मासिटिक इन्ग्रेडियंट म्हणजेच औषधासाठी लागणारे आवश्यक घटक साहित्याची निर्मिती गुजरातमध्ये होणार आहे. सध्या हे औषध कोविडच्या दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमध्ये आहे.

Last Updated : Aug 13, 2020, 2:46 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details