नवी दिल्ली -पंतप्रधान मोदींच्या मलेशिया दौऱ्यानंतर काहीच दिवसात, वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकीर नाईक याला भारतात परत नेण्याबाबत भारत आग्रह नाही, असा दावा मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महातीर मोहम्मद यांनी केला आहे. एका रेडीओला मुलाखतीत 'झाकीर नाईक याला मायदेशात परत पाठवण्याचा प्रस्ताव आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
“बहुतेक देशांना नाईक नको आहे. मी मोदींना याबाबत विचारना केली होती. मात्र, भारत त्याला परत नेण्यास आग्रही नाही. हा माणूस भारतासाठीही त्रासदायक ठरू शकतो ”असे उत्तर डॉ. मोहम्मद यांनी दिले आहे. मोदी आणि मोहम्मद यांच्यात झालेल्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना परराष्ट्र सचिव विजय गोखले म्हणाले होते की, “झाकीर नाईकचा मुद्दा पंतप्रधानांनी चर्चेत उपस्थित केला होता. जाकीर नाईकचा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे. दोन्ही बाजूंनी अधिकारी या संदर्भात संपर्क साधतील यावर एकमत झाले आहे”
हेही वाचा -पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग भेटीवर कलम 370चे सावट
दरम्यान, मोहम्मद यांचे वक्तव्य नाईकला तिसर्या देशात हद्दपार करण्याची शक्यता दर्शवते. “आम्ही त्याला हद्दपार करण्यासाठी ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण, या क्षणी कोणतेही ठीकाण निश्चित झालेले नाही” असेही डॉ. मोहम्मद यांनी सांगितले आहे. 2016 मध्ये ढाका येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर झाकीर अब्दुल करीम नाईक भारत सोडून पळून गेला होता. या हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोर नाईकच्या युट्यूबवरील प्रवचनाने प्रेरित झालेला होता.