करनाल (हरियाणा) -योग्यतेनुसार रोजगार द्या, या मागणीसाठी 23 ऑक्टोबरला उचाना कला येथून काही तरुणांनी पायी रॅली काढली होती. ती रॅली आज (1 नोव्हेंबर) करनाल येथे पोहोचली आहे. यावेळी एसएफआई आणि डीएफआईच्या बॅनर खाली स्वतंत्र निदर्शने केली.
दरम्यान, तरुणांनी मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या घारबाहेर घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पण, स्थानिक पोलिसांनी मुख्यमंत्री आवासाच्या मार्गावर बॅरिकेडींग लावत तरुणांचा मोर्चा अडवला. यावेळी तरुण व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.