पीलीभीत- उत्तरप्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात गोतस्करीला विरोध करणाऱ्या युवकाची गोळी घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरूवार २२ ऑगस्टला जिल्ह्यातील मोहनपूर बबुरा गावात घडली आहे. सोनपाल असे मृत युवकाचे नाव आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मोहनपूर येथील सोनपाल उर्फ सोनू हा जेवण झाल्यानंतर घराबाहेरच्या खाटेवर झोपला होता. यावेळी घराजवळील रस्त्यावर काही लोक गोवंशाच्या जनावरांना एका वाहनात भरत असल्याचे त्याने बघितले. त्यानंतर त्याने गाडी जवळ जाऊन त्या लोकांना गोवंश घऊन जाण्यास विरोध केला. यानंतर चिडलेल्या गोतस्करांनी सोनूवर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाले.