औरंगाबाद (बिहार)- औरंगाबाद शहरातील देवहरा गावातील एका बाल वैज्ञानिकाने कोरोना विषाणूपासून बचावासाठी एका अनोखी छत्री तयार केली आहे. या छत्रीच्या माध्यमातून विषाणूपासून बचावासाठी आवश्यक असेलेले सोशल डिस्टंन्सिंग साध्य होणार आहे. ही छत्री कोरोनापासून नागरिकांचे सुरक्षा करते असा दावा ही या वैज्ञानिकाने केला आहे. विनित कुमार असे वैज्ञानिकाचे नाव आहे.
विनितने निर्माण केलेल्या या छत्रीच्या आत इंजेक्शन्स लावण्यात आले आहे. छत्री खोलल्यावर इंजेक्शन्सवर दाब पडते आणि त्यातील सॅनिटायझर छोट्या नळींच्या सहायाने छत्रीच्या वरच्या भागात पोहोचते. त्यानंतर, हे सॅनिटायझर सर्वत्र छत्रीमध्ये शिंपडले जाते आणि ती सॅनिटाईझ होते. हात धुण्यासाठी छत्रीमध्ये हॅन्ड सॅनिटायझर आणि मास्कची देखील व्यवस्था आहे. त्याचबरोबर, आवश्यकते नुसार या मास्कचा वापरही करता येतो.