बांदा - हसीम नावाचा एक युवक संशयास्पद परिस्थितीत जळाला आहे. हसीमच्या खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावले असल्यामुळे या प्रकरणात संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक लाल भरत कुमार पाल म्हणाले, आग कशी लागली हे सांगणे कठीण आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातला एक युवक संशयास्पद जळून गंभीर जखमी
बांदामध्ये एक युवक संशयास्पद परिस्थितीत जळून गंभीर जखमी झाला. त्याला कानपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात युवक संशयास्पद जाळल्याची शंका व्यक्त केली जात आहे. घटना स्थळी न्याय वैद्यकशास्त्र पथक घटनेचा तपास करत आहे.
बांदामध्ये एक युवक संशयास्पद परिस्थितीत जळून गंभीर जखमी झाला. त्याला कानपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात युवक संशयास्पद जळाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी न्याय वैद्यकशास्त्र पथक घटनेचा तपास करत आहे.
हे प्रकरण कोतवाली क्षेत्रातील गुलर परिसरातील आहे. पहाटे ३ च्या सुमारास हसीम नावाच्या युवकाच्या ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला. हा आवाज ऐकून शेजारी त्याच्या घरी गेले. मात्र, त्याच्या घराला बाहेरुन कुलूप होते. शेजाऱ्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तोपर्यंत हसीम गंभीर भाजला होता. त्याला बांदा द्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला कानपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार हसीम भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्याकडे लोकांचे येणेजाणे सुरू असायचे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.