पाटणा- मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून खून केला. ही घटना आज सकाळी पाटणाच्या बुद्धा कॉलनी येथे घटली. रवि राय असे मृत तरुणाचे नाव आहे.
पाटण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या - बिहार
बिहारच्या पाटणामध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून खून केला.
तो नेहमीप्रमाणे किदवईपूरी पार्कजवळ मॉर्निंग वॉकला गेला होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी अंधाधुंध गोळीबार सुरू केला. यात त्याच्या डोक्यात आणि छातीत गोळी घुसली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रवि हा गुन्हेगारी पार्श्वभूमीतून असल्याने याच वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही पोलीस तपासत असून खूनाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे.