'मैं भी चौकीदार'च्या विरोधात यूथ काँग्रेसचे 'मैं भी बेरोजगार' कॅम्पेन - pm modi
'लोकांनी आणि युवकांना याविषयी जागरूक करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या सरकारने रोजगारासाठी काहीही केले नाही. त्यांनी फक्त मुख्य विषयांवरून लोकांना भरकटवण्याचे काम केले,' असे वालिया म्हणाले.

राहुल गांधी
नवी दिल्ली - भाजपच्या 'मैं भी चौकीदार' प्रचार अभियानाविरोधात यूथ काँग्रेसने 'मैं भी बेरोजगार' कॅम्पेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 'सोशल मीडियावर शनिवारी आम्ही 'मैं भी बेरोजगार' अभियान सुरू केले. याला काही तासांतच ट्विटरवर एक लाखहून अधिक जणांनी ट्विट केले आहे,' अशी माहिती युवा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी (सोशल मीडिया) वैभव वालिया यांनी दिली.
'लोकांनी आणि युवकांना याविषयी जागरूक करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या सरकारने रोजगारासाठी काहीही केले नाही. त्यांनी फक्त मुख्य विषयांवरून लोकांना भरकटवण्याचे काम केले,' असे वालिया म्हणाले.
'अनेक अहवालांद्वारे ही बाब समोर आली आहे की, नवे रोजगार तयार होण्याऐवजी या सरकारच्या कार्यकाळात नोकऱ्यांची संख्या घटली आहे. त्यातच पंतप्रधान आणि मंत्र्यांकडून पकोडे तळणे आणि चौकीदार बनण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. है दुर्दैवी आहे,' असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणात हल्लाबोल केल्यानंतर 'मैं भी चौकीदार' हे अभियान सुरू केले होते. तसेच, भाजपच्या सर्व मंत्र्यांनी ट्विटरवर स्वतःच्या नावाआधी 'चौकीदार' हा शब्द जोडला आहे.