वॉशिंग्टन -इस्रोच्या अथक प्रयत्नानंतर केवळ चंद्रापासून दोन किमी दूर असणाऱ्या विक्रम लँडरचा संपर्क तुटला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नासाने (अवकाश संशोधन संस्था) इस्रोचा प्रवास थक्क करणारा असून यातून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. नासाने आपल्या ट्वीटर हँडलवरुन हे ट्वीट केले आहे.
हेही वाचा - 'चांद्रयान- 2 मोहीम ९५ टक्के यशस्वी', ऑर्बिटर ७ वर्षे करणार चंद्राचा अभ्यास
जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांचे चांद्रयान २ च्या मोहिमेचे कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. याच पार्श्वभूमीवर नासाने देखील इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. शिवाय येणाऱ्या काळात नासाच्या सौर यंत्रणा प्रकल्पावर सोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
हेही वाचा - पुढील १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल - के. सिवन